Download App

Rahul Gandhi : ‘हॅकिंगला घाबरत नाही, अदानींनी माझा फोन न्यावा’; राहुल गांधींचं चॅलेंज!

Rahul Gandhi : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या प्रकरणात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन हॅक करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद लाभलेले उद्योजक गौतम अदानी यांचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यांच्या या आरोपांवर अद्याप सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फोन हॅकिंगला आपण घाबरत नाही. माझा फोन अदानी यांनी खुशाल घेऊन जावा, असे आव्हानही त्यांनी दिला.

Manipur : मणिपुरात आणखी काही दिवस इंटरनेट बंदच; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

विरोधी पक्षांच्या काही नेत्यांचे फोन केंद्र सरकारचे समर्थन असलेल्या हॅकर्सकडून हॅक केले जात आहेत. अॅपल कंपनीकडून तसे अलर्ट संबंधित नेत्यांचे फोन आणि ई मेलवर जात असल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याच मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या शीर्षस्थानी सध्या गौतम अदानी आहेत. अदानी यांच्या निर्देशानुसार सरकारी यंत्रणा हलत आहे. पंतप्रधान मोदी हे सत्तेच्या वर्तुळात दुसऱ्या तर अमित शहा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देशाची सगळी संपत्ती अदानींकडे सोपविण्याचे काम सध्या सुरू आहे. याला विरोध करणाऱ्या विरोधी नेत्यांचे फोम हॅक केले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

अदानींना नक्कीच शिक्षा होईल 

मी फोन हॅकिंगला घाबरत नाही. अदानींनी खुशाल माझा फोन घेऊन जावा. विरोधकांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. अदानींना नक्कीच शिक्षा होईल हे निश्चित आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. या आरोपांवर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

नेमके प्रकरणा काय ? 

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (Cash For Query) संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपला फोन सरकार हॅक करत आहे. तसा अलर्ट आणि ई मेल अॅपल कंपनीकडून आल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर राजकारणात खळबळ उडाली. मोईत्रा यांनी आपल्याबरोबर आणखी काही खासदारांचे फोन हॅक केले जात असल्याचा दावा केला होता.

follow us