मोदी सरकार विद्यार्थ्यांप्रती संवेदनाहीन; पत्रकार परिषद घेत राहुल गांधींकडून सरकारची पोलखोल

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी दिल्लीत इंदिरा भवन येथे पत्राकर परिषद घेऊन मोदी सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर जोरदार प्रहार केला.

News Photo   2026 07 22T164009.574

मोदी सरकार विद्यार्थ्यांप्रती संवेदनाहीन; पत्रकार परिषद घेत राहुल गांधींकडून सरकारची पोलखोल

विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची मागणी करत आहेत. (Rahul Gandhi) मागिल 10 वर्षात 152 पेपर लीक झाले आहेत. यामध्ये गरिब, मध्यम वर्गिय लोक उद्वस्थ झाले आहेत. कित्येक विद्यार्थी नैराश्यात गेले तर अनेकांनी आत्महत्या केली आहे असं म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते दिल्लीत इंदिरा भवनमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुलींची चूक काय?

प्रश्न असा आहे की हे असं का घडलं. हजारो विद्यार्थी होते. सेक्युरीटीने त्यांना मारलं. त्या मुलांनी असं काय चुकीचं केलं होतं. ते शांततेत आंदोलन करत होते. ते मागण्या मागत होते. त्यांनी काही गुन्हा केला नव्हता. पण फक्त देशातील विद्यार्थ्यांचं ऐका असं त्यांचं म्हणणं. आम्हाला शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. आम्हाला काही नको असं त्यांना म्हणायचं होतं. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक विद्यार्थी तणावात होते. सर्वांनी यावर विचार केला पाहिजे. आपली शिक्षण व्यवस्था ही जगातील बेस्ट शिक्षण व्यवस्था मानली जाते. पण आज ती अवस्था राहिली नाही.’

सुरक्षा यंत्रणांना चकवा देत PM मोदींच्या घरापर्यंत राहुल गांधी कसे पोहचले? वाचा आंदोलनाचा सिक्रेट प्लॅन

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या वतीने एकूण तीन मागण्या केल्या आहेत. यात सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची, विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी दुसरी मागणीदेखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, अत्याचार झाला हे मान्य करून मोदींनी मोठ्या मनाने माफी मागावी, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच, ज्यांनी विद्यार्थ्यांसोबत मारहाण केलेली आहे, त्यांना या प्रकरणात जबाबदार धरले पाहिजे, अशी तिसरी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? याबाबत भाष्य केलं. विद्यार्थ्यांसोबत अमानुषपणे वागणूक देण्यात आली आहे. माझ्यासोबत जो व्यवहार झाला, त्याची मला पर्वा नाही. आणखी पाच वेळा जरी माझ्यासोबत असाच व्यवहार झाला तरी मला त्याचे काहीही वाटणार नाही. परंतु विद्यार्थ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे म्हणत आमचा लढा चालूच राहील, असे संकेत त्यांनी दिले.

Exit mobile version