मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (motion of no confidence) लोकसभेत (Lok Sabha) चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत भाग घेतला. लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल यांनी आज पहिल्याच भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींचं भाषण संसद टीव्हीवर केवळ चार मिनिटेच दाखवल्यानं कॉंग्रेसनं तानाशाह डरपोक असल्याची टीका केली. (congress leader rahul gandhi sansad tv congress attack modi government)
आज संभागृहात बोलतांना भाजपसह पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. आज मोदी सरकार राहुल यांच्या निशाण्यावर होते, त्यांच्या भाषणादरम्यान चांगलाच गदारोळ झाला. राहुल यांचे अविश्वास प्रस्तावरील भाषण संसद टीव्हीवर चार मिनिटचं दाखवल्यानं कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली. कॉंग्रेसनं याबाबत ट्विट केलं. त्यात म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी सभागृहात मणिपूरवर १५ मिनिटे ४२ सेकंद भाषण केले. यादरम्यान संसद टीव्हीवर स्पीकर ओम बिर्ला यांना ११ मिनिटे ०८ सेकंद दाखवण्यात आले. राहुलजींना फक्त ४ मिनिटांसाठी दाखवण्यात आले. तानाशाह किती डरपोक आहे, अशी टीका केली.
तानाशाह कितना डरपोक है… समझिए 👇
राहुल गांधी जी सदन में मणिपुर पर 15 मिनट 42 सेकंड बोले।
इस दौरान @sansad_tv पर 11 मिनट 08 सेकंड तक स्पीकर ओम बिरला जी को दिखाया गया।
राहुल जी को सिर्फ 4 मिनट दिखाया गया।
— Congress (@INCIndia) August 9, 2023
मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. भारत हा एक आवाज आहे. आणि तो आवाज तुम्ही मणिपूरमध्ये दाबून टाकला आहे. त्या आवाजाची मणिपूरमधये हत्या करण्यात आली. तुम्ही देशभक्त नाही, देशद्रोही आहात. माझी एक आई (सोनिया गांधी) इथे संसदेत बसली आहे आणि तुम्ही मणिपूरमध्ये दुसऱ्या आईची हत्या केली, असे राहुल म्हणाले.
मोदी मणिपूरला का गेले नाहीत?
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, ते एकदाही मणिपूरला गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना देशाच्या आवाजाची चिंता नाही. रावण मेघनाद आणि कुंभकर्ण या दोन लोकांचे ऐकत असे. त्याचप्रमाणे मोदीजीही फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात, एक म्हणजे अमित शाह आणि दुसरे अदानी. हनुमानाने लंकेला आग लावली नाही. अहंकाराने लंकेला जाळलं होतं. रामाने रावणाला मारलं नाही, अहंकाराने रावणाला मारलं. तुम्ही देशभर केरोसिन फेकत आहात. तुम्ही हरियाणा जाळत आहात. तुम्ही अख्खा देश पेटवण्याचे काम करत आहात, असं म्हणत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.
राहुल यांनी ऐकवली मणिपूरची व्यथा
सभागृहात मणिपूरची व्यथा मांडताना राहुल गांधी म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो, मात्र आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेलेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हे भारतात नाही. मणिपूर भारताचं राज्य नाही मी मणिपूरमधील मदत शिबिरात महिला आणि मुलांशी बोललो. तिथे एक महिला म्हणाली- ‘मला एकच मूल होतं, त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घालण्यात आल्या.’