Congress Manifesto In Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले होते. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली होते. तर कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले कॉंग्रेसने होते. काँग्रेसच्या याच जाहीरनाम्यावर जोरदार राजकारण सुरू झालं होतं.
ಮೈಸೂರಿನ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆದು ರಾಮಭಕ್ತ ಹನುಮನಿಗೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿದೆ.
ಹನುಮನೆಂದರೆ ಶಕ್ತಿ, ಹನುಮನೆಂದರೆ ಶಾಂತಿ, ಹನುಮನೆಂದರೆ ಜಗವ ಕಾಯೋ ಕಾಂತಿ. pic.twitter.com/NTYLdVpLON
— DK Shivakumar (@DKShivakumar) May 4, 2023
यावर बजरंग दल आक्रमक झालं तर भाजपने कडाडून विरोध केला. मोदींनी या प्रकरणावर म्हटले होते की, मी हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. त्याचवेळी काँग्रेस पार्टीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलुपबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी श्रीरामाला कुलुपात बंद केले आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना कुलुपात बंद करण्याचा संकल्प केला आहे. देशाचे हे दुर्दैव आहे की काँग्रेस पार्टीला प्रभू श्रीरामापासून तकलीफ होत होती आता त्यांना जय बजरंगबली म्हणणाऱ्यांचाही त्रास होत आहे.
Karnataka Assembly Elections : मतदारांनो ‘जय भवानी जय शिवाजी’ नारा द्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन
त्यानंतर आता कॉंग्रेसने आपल्या भूमिकेवरून युटर्न घेतला आहे. आता कॉंग्रेसने थेट सत्तेवर आल्यास बजरंग दलावर बंदी घालणार नाही. तर याही पुढे जात कॉंग्रेसने आता हनुमान मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. राज्य युनिट प्रमुख डी. के. शिवकुमार म्हणाले की, सत्तेवर आल्यास आम्ही भगवान हनुमानाच्या नावाने विशेष योजना सुरू करू. ज्या योजनेची तरूणांमा मदत होईल. तसेच पक्ष राज्यातील हनुमान मंदिरांचा विकास करेल. असं अश्वासन त्यांनी दिलं आहे.