Download App

Dheeraj Sahu : ‘350 कोटी माझे नाहीत, तो पैसा कुटुंबाचा’; काँग्रेस खासदार साहूंनी सोडले मौन

Dheeraj Sahu : काँग्रेस खासदाराकडे साडेतीनशे कोटींहून आधिक रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. पाच दिवस सलग मोजणी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ही रक्कम जप्त केली. या घटनेचे पडसाद देशभराच्या राजकारणात उमटले. भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता या प्रकरणात खुद्द काँग्रेस खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांनी मौन सोडले. एएनआयशी संवाद साधताना साहू यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. मी मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून राजकारणात आहे. रांची आणि ओडिशात अनेक विकासकामे केली आहेत. माझे वडीलही गरीबांची मदत करत असत. आम्ही अनेक शाळा आणि महाविद्यालयये सुरू केली. आता जे काही घडत आहे त्यामुळे मला खूप दुःख होत आहे.

Dheeraj Sahu : तीन दिवसांत 300 कोटींचं घबाड; चौथ्या दिवशीही छापेमारी सुरुच

आता जो पैसा प्राप्तिकर विभागाने जप्त (Income Tax Raid) केला आहे. तो सगळा पैसा आमच्या व्यवसायातील आहे. मागील शंभर वर्षांहून आधिक काळापासून आमचा मद्यविक्रीचा व्यवसाय आहे. यातून आम्ही सरकारला मोठा महसूलही दिला आहे. हा सगळा पैसा मद्य व्यवसायातला आहे. कारण, दारू विक्री रोखीत होत असते. या पैशांचा आणि काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी काहीच संबंध नाही. हा पैसा माझ्या कुटुंबियांचा आणि कंपन्यांचा आहे. याचा सगळा हिशोब देण्यास मी तयार आहे, असे खासदार साहू यावेळी म्हणाले.

कोण आहेत धीरज साहू ?

धीरज साहू हे मोठे उद्योगपती आहेत. यासोबतच ते मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित आहेत. आयकर विभागाने झारखंड, ओडिशा आणि बंगालमधील समूहाच्या 10 ठिकाणी छापे टाकले. बलदेव साहू कंपनीच्या बोलंगीर कार्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सातपुडा कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकून 350 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. छाप्यादरम्यान, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा बंडलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. एवढी मोठी रोकड सापडल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाला मशिन वापरून नोटा मोजाव्या लागल्या आहेत. छाप्यानंतर पैशांच्या 157 बॅगमध्ये भरल्या नंतर बॅग कमी पडल्यावर नोटा बॅगमध्ये भरून ट्रकमध्ये टाकल्या आणि बँकेत नेल्या आहेत.

झारखंड राज्यातील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयकर अधिकाऱ्यांना बोलांगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छाप्यात नोटांनी भरलेले 156 बॅग मिळाल्या. या बॅगांपैकी फक्त सहा ते सात बॅगांमधूल पैशांची मोजणी झाली आहे. ही छापेमारी संबलपूर, बोलांगीर, टिटिलागढ, सुंदरगढ, राउरकेला आणि भुवनेश्वर या ठिकाणी केल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags

follow us