Download App

कॉंग्रेसवाले फक्त मीडियाशी बोलतात, अमित शहा यांची टीका

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 6 सदस्यीय समिती स्थापन केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली आहे. या समितीत दोन निवृत्त न्यायाधीशही आहेत. दरम्यान, ज्यांच्याकडे या प्रकरणी काही पुरावे असतील त्यांनी ते पुरावे या समितीला द्यावेत. तपासात काही चुकीचे आढळले तर कुणालाही सोडले जाणार नाही, असे शहा यांनी सांगितले.

शहा काल दिल्लीतील एका वृत्तवाहिन्याशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, देशातील न्यायालयांवर सर्वांचा विश्वास असायला हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीसह सेबीही या प्रकरणाची चौकशी करत आहे. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत, कारण ते चौकशीत टिकत नाहीत.

राहुल यांना इंदिराजींच्या विधानाची आठवण दिली
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरही शहा यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आणीबाणीनंतर राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी इंग्लंडला गेल्या होत्या. त्यावेळी त्या विरोधी पक्षात होत्या आणि सरकार त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या तयारीत होते.
त्यावेळी त्यांना इंग्लंडमध्ये विचारल्या गेलं की, तुमचा देश कसा चालला आहे. त्यावर उत्तर देताना इंदिराजी म्हणाल्या की, माझा देश चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांनी म्हणाल्या, काही प्रश्न आहेत, पण मला त्याबद्दल इथं बोलायचं नाही. मी इथं केवळ एक भारतीय आहे. मी माझ्या देशाबद्दल काहीही बोलणार नाही.

विरोधी पक्षांनी चर्चा केली तर संसद चालेल
अमित शाह म्हणाले की, विरोधी पक्षांनी पुढे येऊन चर्चा केल्यास संसदेत सुरू असलेला गदारोळ संपू शकतो. दोन्ही पक्षांनी सभापतींसमोर बसून चर्चा केल्यास संसदेचे कामकाज सुरळीत चालू शकेल. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, ते फक्त मीडियाशी बोलतात, पत्रकार परिषदा घेतात. यातून काहीही होऊ शकत नाही. प्रत्येकाला संसदेत बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, पण त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल.

Ahmednagar शहराला गारांच्या पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ

यावेळी शहा म्हणाले की, सीबीआय आणि ईडीसह सर्व तपास यंत्रणा निष्पक्षपणे काम करत आहेत. या एजन्सी न्यायालयाच्या वरच्या नाहीत. त्यांच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. एजन्सीच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याऐवजी हे लोक बाहेरच का ओरडत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us