दिल्ली स्फोटाशी कनेक्शन ! जम्मू-काश्मीरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू 29 हून अधिक जखमी

blast at Nowgam police station जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट, दिल्ली हल्ल्यात जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट

Blast At Nowgam Police Station

Blast At Nowgam Police Station

Connection to Delhi blast! Massive blast at Nowgam police station in Jammu and Kashmir; 9 dead, over 29 injured : देशाची राजधानी दिल्लीच्या सर्वात सुरक्षित मानला जाणाऱ्या भागामध्ये भयावह बॉम्बस्फोट झाला, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यानंतर आता त्याच हल्ल्याशी संबंधित जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील गाम पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फरीदाबादमधून डॉक्टर मुजम्मीलच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा हा स्फोट झाला आहे. यामध्ये तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला असून 29 हूअधिक लोक जखमी आहेत.

मेष ते मीन, आजच्या ग्रहमानाचा बाराही राशींवर काय परिणाम होणार?

तसेच या स्फोटामध्ये 12 हून अधिक वाहन जळून खाक झाले आहेत. हो स्फोट इतका भयानक होता की, सात किलोमीटर दूर असलेल्या छान पोरा सनतनगर, रावलपोरा आणि पंथा चौक या भागापर्यंत त्याचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या स्फोटतील काही विस्फोटक या ठिकाणी ॅम्पलींग करताना हा स्फोट झाला आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान यामध्ये गंभीर जखमी असलेल्या रुग्णांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. यातील दहा लोकांना उजाला सिग्नल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. त्याचबरोबर श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंह हॉस्पिटलमध्ये काही लोकांना दाखल केले गेले आहे. 

नेमकी घटना काय?

जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशन या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा जप्त करण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटा झाला आहे. दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्युलचं तपास या ठिकाणी सुरू होता. फॉरेन्सिक टीम या स्फोटकांचे नमुने घेत होती. मात्र त्याचवेळी हा स्फोटा झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरामधील घरांचे दरवाजे खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. हा साठा दिल्ली स्फोटातील आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आला होता.

Video : बिहारमध्ये ‘फिर एकबार ‘NDA’ सरकार, गठबंधनचा सुपडासाफ, पंतप्रधान काय म्हणाले?

दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात कारमध्ये मोठा स्फोट झाला. (Delhi) या स्फोटने आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या होत्या. विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेली. या घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखंमी झाल्याची माहिती समोर आली.

Exit mobile version