Download App

Dawood Ibrahim : बॉम्बस्फोट, टार्गेट किलिंग अन्…; दाऊदने भारतात कोण कोणते गुन्हे केले?

  • Written By: Last Updated:

Dawood Ibrahim Criminal History : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंचर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्यप पुष्टी झालेली नाही. जगातील अनेक देश विशेषतः भारत अनेक वर्षांपासून दाऊदचा शोध घेत आहे. एकेकाळी मुंबईत दाऊदच्या दशशतीने मोठी घबराहट पसरलेली होती. दाऊद पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे अनेक पुरावे भारताकडून देऊनही पाकिस्तानने हे वृत्त सातत्याने नाकारले आहे. दाऊद इब्राहिमच्या गुन्ह्यांची यादी बरीच मोठी आहे. जाणून घेऊया दाऊद इब्राहिमने भारतात कोणते गुन्हे केले आहेत?

‘अमोल कोल्हेंनी त्यांनी अंतरकरनातून टीका केली नाही….’; अमोल मिटकरींचं सुचक वक्तव्य

दहशतवाद आणि बॉम्बस्फोट

मुंबईत 1993 साली घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दाऊद मुख्य सूत्रधार होता. या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणा त्याच्या शोधात होत्या. मुंबईतील बॉम्बस्फोटात 250 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. दहशतवादी कारवायांबद्दल बोलायचे झाल्यास दाऊदचे अल कायदा आणि लष्करसोबतचे संबंधही समोर आले होते.

खंडणीच्या नवीन पद्धती तयार केल्या

दाऊद हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता. मात्र, आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात दाऊद वाईट संगतीत पडला. चोरी, दरोडा आणि तस्करीने त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊत टाकले. त्यानंतर तो कुख्यात डॉन करीम लाला गँगच्या संपर्कात आला. यानंतर पैसे उकळणारा दाऊद सट्टेबाजी, चित्रपटांना पैसे पुरवण्यासह अन्य अवैध धंद्यात उतरला. दाऊद बॉलिवूड सेलिब्रिटी आणि निर्मात्यांकडून पैसे उकळायचा. खंडणीतून जमा केलेली ही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर, सर्व हवाला व्यवसायात दाऊदचा हातखंडा होता.

लिबियातून युरोपात जाणारे जहाज बुडाले, 61 प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

टार्गेट किलिंग

साबीर इब्राहिम कासकर यांची 1981 मध्ये हत्या झाली होती. साबीर हा दाऊदचा भाऊ होता. साबीरवर चार जणांनी पाच गोळ्या झाडल्या. भावाच्या हत्येने संतापलेल्या दाऊदने 1986 मध्ये देश सोडला. मात्र, त्याने डी कंपनीच्या गुंडांमार्फेत टार्गेट किलिंग सुरू केल्याचे सांगितले जाते. भावाच्या हत्येनंतर पठाण टोळीतील सर्व सदस्यांना ठार मारण्याचे आदेश दाऊदने दिले होते.

दाऊदसारखाच अमोल शिंदेही ‘दहशतवादी’ ठरणार! धडकी भरवणारा UAPA कायदा काय आहे?

अंमली पदार्थांची तस्करी

खंडणी, टार्गेट किलिंगशिवाय दाऊद अंमली पदार्थांचीदेखील तस्करी करत होता. दाऊद अफू आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा धंदाही करत होता. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थांशी हातमिळवणी करून दाऊद जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करत असे. ड्रग्जमधून कमावलेल्या पैशातून दाऊद ऐशोआरामत जगण्यासोबत पाकिस्तानी सुरक्षा एजन्सींना निधीही पुरवत होता.

Tags

follow us