Sonam Wangchuk : केंद्र सरकारशी डील केली? स्पष्टीकरण देत सोनम वांगचुक ट्रोलर्सवर संतापले

 Sonam Wangchuk : नीट पेपर फुटीविरोधात आणि देशातील शिक्षण पद्धतीत बदल करण्यात या मागणीसाठी सुरु असणारा उपोषण समाजसेवक सोनम वांगचुक

 Sonam Wangchuk

 Sonam Wangchuk

 Sonam Wangchuk : नीट पेपर फुटीविरोधात आणि देशातील शिक्षण पद्धतीत बदल करण्यात या मागणीसाठी सुरु असणारा उपोषण समाजसेवक सोनम वांगचुक 26 दिवसानंतर केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत मागे घेतल्याने सोशल मीडियावर अनेक सोनम वांगचुक यांच्यावर टीका करताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांनी सरकारशी काही डील केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.
तर आता या प्रकरणात सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. मागण्या मान्य करुन घेण्यासाठी 26 दिवस उपोषण केल्यानंतरही आता मला माझ्या प्रामाणिकपणाची सिद्धता द्यावी लागेल का ? मी केंद्र सरकारशी डील करेन का? असा प्रश्न सोनम वांगचुक यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना विचारला आहे.
 सोनम वांगचुक म्हणाले की, 26 दिवसांचं उपोषण मागे घेतल्यानंतर मला अजूनही माझी प्रमाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का? विद्यार्थ्यांसाठी 26 दिवस उपोषण केल्यानंतर 11 किलो वजन कमी झाल्यावर आणि लडाखच्या प्रचंड थंडीकून थेट दिल्लीच्या कडक उन्हात हे सर्व सहन केल्यानंतर, माझं उपोषण किती पवित्र होते, मी ते कोणाच्या हातून सोडलं किंवा मी काही तडजोड केली की नाही याचे चारित्र्य प्रमाणपत्र मला कोणाकडून घेण्याची गरज आहे का? असं सोनम वांगचुक म्हणाले.

पुढे बोलताना सोनम वांगचुक म्हणाले की, मी कोणालाही दोष देत नाही, कारण तुमच्यापैकी बहुकेकांना मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आहे याची कल्पना नाही. गेल्या 1-2 आठवड्यांत माझं कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेलं आहे हे तुम्हाला माहित नाही. कालपासून मी फक्त द्रव पदार्थ खात आहे, ज्यामुळे मला थोडी ऊर्जा मिळाली आहे. सकाळपासून लोक मला फोन करत आहेत किंवा पोस्ट दाखवत आहेत आणि म्हणत आहेत, तुमच्याबद्दल खूप प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लाने दिली सर्वात मोठी अपडेट

तुम्ही केंद्रीय मंत्र्यांकडून उपोषण का सोडला? तुम्ही दुसऱ्या कोणाकडून का नाही सोडला? मात्र मला जर डील करायची असती तर मी 26 दिवस उपाशी राहिले असते का? किती लोकांनी डील केली आहे. डील अशीच करतात का? एसी रुममध्ये बसून डील केली असती असं देखील सोनम वांगचुक म्हणाले.

Exit mobile version