Download App

BJP First Candidate List : दिल्ली विधानसभेसाठी भाजपकडून 29 उमेदवारांची यादी जाहीर; केजरीवालांना कोणाचे आव्हान?

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा (Pravesh Sahib Singh Verma) यांना तिकीट दिले आहे.

  • Written By: Last Updated:

BJP First Candidate List : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठ (Delhi Assembly elections) राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता भाजपची पहिली (BJP First Candidate List) यादी जाहीर करण्यात आली असून यात 29 उमेदवारांचा समावेश आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुखरविंद केजरीवा (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा (Pravesh Sahib Singh Verma) यांना तिकीट दिले आहे.

राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला आमदारांसह खासदारांची पाठ, अंतर्गत वाद चव्हाट्यावर? 

भाजपने या यादीतील 29 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या पहिल्या यादीत आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या विरोधात भाजपने अनेक प्रमुख चेहरे उतरवले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने माजी खासदार प्रवेश साहिब सिंग वर्मा यांना तिकीट दिले आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात कालकाजी मतदारसंघातून माजी खासदार रमेश बिधुरी यांना मैदानात उतरवलं. विशेष म्हणजे आपमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या कैलाश गेहलोत यांना बिजवासन मतदारसंघातून पक्षाने तिकीट दिले आहे.

भाजपने आदर्श नगर मतदारसंघातून राजकुमार भाटिया, बदलीमधून दीपक चौधरी, रिठालामधून कुलवंत राणा, नांगलोई जाटमधून मनोज शौकीन, मंगोलपुरीमधून राजकुमार चौहान, रोहिणीमधून विजेंद्र गुप्ता, शालीमार बागमधून रेखा गुप्ता, मॉडल टाऊनमधून अशोक गोयल, करोल बागमधून दुष्यंत कुमार गौतम, पटेल नगरमधून राजकुमार आनंद, राजौरी गार्डन येथून सरदार मनजिंदर सिंग सिरसा आणि जनकपुरीमधून आशिष सूद यांना तिकीट दिलं.

Pooja Sawant : पूजा सावंतचा पांढऱ्या गाऊनमधील लूक… 

यासोशिवाय, नवी दिल्लीतून प्रवेश साहिब सिंग वर्मा, जंगपुरामधून सरदार तरविंदर सिंग, मालवीय नगरमधून सतीश उपाध्याय, आरके पुरममधून अनिल शर्मा, मेहरौलीतून गजेंद्र यादव, छतरपूरमधून कर्तारसिंग तंवर, आंबेडकर नगरमधून खुशीराम चुनार, कालकाजीमधून रमेश बिधुरी, बदलपूरमधून नारायण दत्त शर्मा, पटपरगंजमधून रवींद्र सिंग नेगी, विश्वास नगर येथील ओम प्रकाश वर्मा, कृष्णा नगरमधून अनिल गोयल, गांधीनगरमधून अरविंदर सिंग लवली, सीमापुरीतून कुमारी रिंकू, रोहतास नगरमधून जितेंद्र महाजन आणि घोंडामधून अजय महावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसऱ्या पक्षातून बंडखोरी करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनाही भापजने विधानसभा निवडणुकीत संधी दिली. यामध्ये करतार सिंग तंवर, राजकुमार चौहान, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांचा समावेश आहे..

पहिल्या यादीत दोन महिलांना तिकीट

भाजपने 29 जागांसाठी ज्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात दोन महिला आहे. रेखा गुप्ता यांना शालिमार बागमधून उमेदवारी देण्यात आली. तर कुमारी रिंकू यांना सीमापुरी या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

आपकडून 70 जागांसाठी उमेदवार जाहीर

आम आदमी पार्टीने दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनेही अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. आता भाजपनेही 29 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

फेब्रुवारीत होऊ शकतात निवडणुका…
दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नेहाती. लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करू शकते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला निवडणुका होऊ शकतात.

follow us