Delhi Election Results : देशाची राजधानी नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. थोड्याच वेळात निकाल हाती येऊन चित्र स्पष्ट होणार आहे. यंदा दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात कांटे की टक्कर असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप बहुमत पार करताना दिसत आहे. परंतु, आता भाजपाची आघाडी कमी होताना दिसत आहे. आम आदमी पार्टीने 30 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांची आघाडी संपुष्टात आली आहे. केजरीवाल 300 मतांनी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत.
पटपडगंज विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांनी मतमोजणी केंद्रावर आम आदमी पार्टीचे उमेदवार अवध ओझा यांची भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार मनिष चौधरी देखील उपस्थित होते. या मतदारसंघात भाजपचे नेगी यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
#WATCH पटपड़गंज विधानसभा सीट से भाजपा के रविंदर सिंह नेगी ने CWG स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मतगणना केंद्र पर AAP के उम्मीदवार अवध ओझा से हाथ मिलाया। कांग्रेस के उम्मीदवार अनिल चौधरी भी मौजूद हैं। पटपड़गंज सीट से AAP के अवध ओझा पीछे चल रहे हैं और भाजपा के रविंदर सिंह नेगी आगे चल रहे… pic.twitter.com/WRqX0dAqXb
— ANI_HindiNews (@AHindinews) February 8, 2025
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी 20 जागांवर तर भाजपा 37 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. आतापर्यंत 57 जागांचे कल हाती आले आहेत.
जम्मू काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला खोचक टोला लगावलाय.
Aur lado aapas mein!!! https://t.co/f3wbM1DYxk pic.twitter.com/8Yu9WK4k0c
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 8, 2025
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच नवी दिल्ली मतदारसंघात आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल पिछाडीवर होते. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आघाडी घेतली होती. परंतु, आता चित्र बदलले आहे. अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच आघाडी घेतली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल दीड हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. भाजपने सध्या 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टी 20 जागांवर आघाडीवर आहे.
जनकपुरी मतदारसंघात आप उमेदवार प्रवीण कुमार आघाडीवर आहेत. करावल नगरमधून भाजपचे कपिल मिश्रा यांनी आघाडी घेतली आहे. किराडीतून आप उमेदवार अनिल झा आघाडीवर आहेत. नवी दिल्ली मतदारसंघातून सध्या भाजपाचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. चांदनी चौकमधून भाजप उमेदवार सतीश जैन आघाडीवर आहेत. दिल्ली कँटमधून भाजपाचे भुवन तंवर आघाडीवर आहेत. तसेच बिजवासन मतदारसंघात भाजपाचे कैलास गेहलोत आघाडीवर आहेत.
पटपडगंज विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपाचे रवींद्र नेगी आघाडीवर आहेत. मनीष सिसोदिया यांनी ही जागा सोडली होती. यंदा या मतदारसंघात भाजप उमेदवार जोरदार टक्कर देताना दिसत आहे. कालकाजी मतदारसंघात पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. या मतमोजणीत भाजप उमेदवार रमेश बिधुडी यांनी आघाडी घेतली आहे. तर सीएम अतिशी मागे पडल्या आहेत. हे सुरुवातीचे अंदाज आहेत. अजून ईव्हीएम मतमोजणी सुरू झालेली नाही.
दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे. या मोजणीत अरविंद केजरीवाल, अतिशी आणि मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत. तर भाजपने पाच जागांवर आघाडी घेतली आहे.
दिल्लीतील ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार शिखा राय निवडणूक निकालाआधी कालकाजी मंदिरात पोहोचल्या. येथे त्यांनी दर्शन घेतले.
#WATCH | BJP candidate from the Greater Kailash Assembly seat, Shikha Rai visits and offers prayers at the Kalkaji temple on the Delhi Assembly election result day. pic.twitter.com/APJZchItug
— ANI (@ANI) February 8, 2025
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. स्ट्राँग रुमच्या आसपास त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी 11 जिल्ह्यांतील 19 केंद्रांवर होत आहे. प्रत्येक केंद्राव दोन अर्धसैनिक दलांच्या तुकड्या तैनात आहेत.