नवी दिल्ली : दिल्ली दारु धोरणप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कवितामागे (K Kavitha) ईडीची पीडा लागली आहे.
दिल्ली दारु धोरण (Delhi Liquor Policy)प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज गुरुवारी बीआरएस एमएलसी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआरची मुलगी के कविताला (K Kavitha)नवीन नोटीस (Notice)बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीनं के कविताला 20 मार्चला चौकशीसाठी (Inquiry)नोटीस बजावली आहे. आज कविताला ईडीनं याच प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं.
अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) दिल्ली दारु धोरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बीआरएस नेत्या कविता यांना 20 मार्च रोजी नवीन समन्स बजावलं आहे. सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रलंबित याचिकेचा दाखला देत त्यांनी गुरुवारचे समन्स वगळल्यामुळं ही नोटीस बजावली आहे. येथे त्यांनी समन्स रद्द करून अटक टाळण्याचं आवाहन केलं आहे.
वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता, आशिष शेलारांचा ठाकरेंवरती हल्ला
कविता या दक्षिण गटाच्या प्रतिनिधींपैकी एक आहे, ज्यांच्यावर आपच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. त्यांच्यापैकी कविता एक आहेत. 20 मार्चपर्यंत सिसोदिया न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत.
दिल्ली दारु धोरण घोटाळ्यावरुन भाजपकडून सातत्यानं आम आदमी पक्षावर निशाणा साधला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून मद्य धोरणाच्या मुद्द्यावरुन ‘आप’वर जोरदार टीका केली जातेय.