Download App

Delhi : आपच्या कार्यकर्त्यांचे जोरदार प्रदर्शन, पोलिसांसोबत हातापायी

दिल्ली :  दिल्लीचे ( Delhi )  उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodiya ) यांना काल रविवार रोजी सीबीआयने (CBI ) अटक केली आहे. त्यांना आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष जज एमके नागपाल हे या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात  निदर्शने केली आहेत. सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप आहे.

सीबीआयने रविवारी सिसोदिया यांची 8 तास चौकशी केली होती. यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. यानंतर पोलिसांनी आपच्या अनेक कार्यकर्त्यांना व नेत्यांना अटक केली आहे. आम्ही दिल्लीच्या भाजप कार्यालयाला घेराव घालू, अशी भूमिका आपने घेतली आहे.

(भर सभागृहात फडणवीसांनी पटोलेंना सुनावलं; ‘माहिती नसले तर जाऊन PA ला विचारा’)

या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पक्ष कार्यलयाच्या बाहेर जोरदार प्रदर्शन केले आहे. यानंतर पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापटी देखील झाली आहे. तसेच महिला कार्यकर्त्या व महिला पोलिस यांच्यामध्ये देखील हातापायी झालेली पहायला मिळाली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना चेतावणी देखील दिली आहे. यातील काही नेत्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान जुलै 2022 मध्ये दिल्लीचे उप-राज्यपाल वीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सक्सेना यांनी सिसोदियांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर ईडी व सीबीआयने सिसोदिया यांच्या विरोधात चौकशी सुरु केली होती. या प्रकरणात भाजपने सिसोदियांवर 144 कोटी रुपये दारू ठेकेदारांचे माफ केल्याचा आरोप लावला होता.

Tags

follow us