Download App

Google सर्च केलं : पत्नी, मुलीची हत्या करत बड्या अधिकाऱ्याची आत्महत्या

  • Written By: Last Updated:

दिल्ली : येथे पत्नी आणि 6 वर्षीय मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशील (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. तर अनुराधा (४०) से मृत पत्नी आणि आदिती (६) असे मृत मुलीचे नाव आहे. याशिवाय मृत सुनील यांनी 13 वर्षाच्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मुलगा रुग्णालयात दाखल असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (A senior officer committed suicide by killing his wife and 6-year-old daughter)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांनी पत्नी अनुराधा आणि २ मुलांवर घरातच कोयत्याने वार करुन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. कोयत्याने वार करुन सुशील यांनीही घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. तपासादरम्यान, पोलिसांनी घरात ठेवलेला कॉम्प्युटरही तपासला, यात सुशीलने “How To Hang” म्हणजेच कसे फाशी कशी घ्यायची असे सर्च केले होते.

यामुळे संगणकावर शोध घेत सुशीलने आत्महत्या केली का? सुशीलने पत्नी आणि मुलीची हत्या का केली? स्वतः आत्महत्या का केली? अशा विविध प्रकरणांचा तपास घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास पीसीआर कॉलवर कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण डी-ब्लॉक 78/1 गली क्रमांक 8, ज्योती कॉलनी, शाहदरा येथून बोलत असल्याचे सांगितले. तो म्हणाला- सुशील कुमार माझ्यासोबत मेट्रोमध्ये काम करतात. आज ते कार्यालयात आले नाहीत. मी त्यांना फोन केला तेव्हा ते रडत होते. तसेच मी घरातल्या सगळ्यांना मारलं असल्याच ते सांगत होते. पण आता ते फोन उचलत नाहीत.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कॉलची पडताळणी केली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, याठिकाणी पोलिसांना ३ जणांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्याचवेळी पत्नी अनुराधा आणि मुलीच्या मृतदेहावर कोयत्याने वार केल्याने मोठ्या प्रमाणावर जखमा आढळून आल्या आहेत. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळाची पाहणी करत आहेत. पोलिसांनी घर सील करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Tags

follow us