दिल्लीतील आप नेते सत्येंद्र जैन तिहार जेलच्या बाथरूममध्ये पडले, प्रकृती गंभीर

Satyendar Jain Hospitalized: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना पश्चिम दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्कर आल्याने ते तिहार तुरुंगातील (Tihar Jail) बाथरूममध्ये पडले होते. या घटनेत ते गंभीर जखमी झाला आहे. याआधीही सत्येंद्र जैन बाथरूममध्ये […]

UPSC Exam (2)

UPSC Exam (2)

Satyendar Jain Hospitalized: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना पश्चिम दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्कर आल्याने ते तिहार तुरुंगातील (Tihar Jail) बाथरूममध्ये पडले होते. या घटनेत ते गंभीर जखमी झाला आहे. याआधीही सत्येंद्र जैन बाथरूममध्ये पडून त्यांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

सध्या दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंग क्रमांक सातमध्ये आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता ते बाथरूममध्ये पडले होते. बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत.

‘नेहरुंच्या परंपरेवर भाजप चालणार’, अमित शाहांनी सांगितला ‘सेंगोल’चा किस्सा

माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मणक्याचीही शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना मणक्याच्या समस्येमुळे कमरेला पट्टा बांधला आहे. मणक्याच्या समस्येमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आठवडाभरात त्यांना दुसऱ्यांदा दाखल करण्यात आले आहे.

सत्येंद्र जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात त्याचे वजन 35 किलोने कमी झाले आहे. त्यांना मस्कुलर ऍट्रोफीचा त्रास आहे. या सर्व घटनांमुळे सत्येंद्र जैन हे देखील प्रचंड नैराश्यात आहेत. यासंदर्भात त्यांनी तुरुंग प्रशासनाला पत्रही लिहिले होते. तुरुंगात त्यांना नैराश्य असल्याचे निदान झाले, त्यानंतर त्यांना औषधे आणि थेरपी देण्यात आली होती. सात दिवसांत दुसऱ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version