काँग्रेसचा विजयला मदतीचा ‘हात’ नाराज डीएमकेने तोडली युती; वेगळं बसण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र

DMK अभिनेता विजयला समर्थन देण्यावरून आता डीएमके आणि काँग्रेसमधील तणाव आणखी वाढला असून हा वाद आता चेन्नईहून थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

DMK

DMK

DMK latters to Loksabha president for change in seating arrangement inside Lok Sabha after congress suppor to TVK : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाला पाठिंबा दिल्याने DMK ने काँग्रेसवर ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने पाठीवर खंजीर खुपसल्याची टीका डीएमके कडून करण्यात आली होती. अभिनेता विजय यांना समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून आता डीएमके आणि काँग्रेसमधील तणाव आणखी वाढला असून हा वाद आता चेन्नईहून थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

फायनल! पंश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

डीएमकेच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून लोकसभेतील DMK खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “इंडियन नॅशनल काँग्रेससोबतची आमची युती संपुष्टात आल्यामुळे सभागृहात त्यांच्यासोबत सध्याच्या आसनव्यवस्थेत बसणे योग्य ठरणार नाही.”

डीएमकेने काँग्रेसशी युती तोडली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अभिनेता थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत. डीएमके ला 59 तर एआयएडीएमके ला 47 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा छोट्या पक्षांकडे गेल्या आहेत. भाजपला केवळ एक जागा मिळाली आहे. सत्ता स्थापनेची किल्ली CPI, CPI(M), VCK आणि PMK सारख्या छोट्या पक्षांकडे आहे.

निवडणूक पश्चिम बंगलाची अन् संजय राऊतांचं पत्र थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना

डीएमकेसोबत निवडणूक लढलेल्या काँग्रेसला पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसने TVK ला उघड पाठिंबा दिल्यानंतर तमिळनाडूतील राजकारण तापले आहे. तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 10 मेपर्यंत आहे. अशातच दोन छोट्या पक्षांनी विजय यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर डीएमकेने काँग्रेसशी युती तोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन यांचा पराभव TVK च्या उमेदवाराकडून झाला होता.

‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का

डीएमके हा ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष मानला जात होता. मात्र डीएमके बाहेर पडल्याने विरोधकांची एकजूट कमकुवत झाल्याचे मानले जात आहे. कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर काँग्रेस आणि डीएमके मधील दरी स्पष्टपणे समोर आली आहे. याआधी कनिमोळी यांनी दिल्लीमध्ये काँग्रेससोबत राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र चेन्नईत डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान हे मोठे राजकीय घडामोडी घडल्या आहेत. लोकसभेत डीएमके चे 22 खासदार असून राज्यसभेत पक्षाचे 10 सदस्य आहेत.

 

Exit mobile version