Download App

डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात दहशतवादी हल्ला, वरीष्ठ अधिकाऱ्यासह 4 जवानांचा मृत्यू

सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात जंगल परिसरात झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद झाल्याची माहिती आहे.

  • Written By: Last Updated:

Doda Encounter : जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात जंगल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये काल रात्री चकमक झाली. या चकमकीत ४ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी दुपारी 2.45 च्या सुमारास देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उर्बगी येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. यानंतर चकमक सुरू झाली. त्यामध्ये ही घटना घडली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून, पूर्ण माहिती मिळेपर्यंत कारवाई सुरूच असल्याचृं लष्करानं सांगितलं आहे.

गोळीबार सुरू झाला भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान; इचलकरंजीची केली पाक व्याप्त काश्मिरशी तुलना

परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने या चकमकीबद्दल अधिकृत माहिती दिली. “गुप्तचर माहितीच्या आधारे काल रात्री डोडाच्या उत्तरेकडील भागात भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मिर पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. रात्री 9 च्या सुमारास दहशतवाद्यांचा पत्ता लागला आणि दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला, अशी माहिती व्हाईट नाईट्स कॉर्प्सने एका एक्स पोस्टमध्ये दिली आहे.

शस्त्रसाठा जप्त

येथे 24 तासांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत ठार झालेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच सतर्क पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.

हँडग्रेनेडचा समावेश IAS पूजा खेडकरसह अन्य पाच अधिकाऱ्यांचीही सोशलवर चर्चा; नेमकं कारण काय?

या चकमकीच्या आदल्या दिवशी म्हणजेत रविवारी लष्कराने, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रं आणि दारूगोळा जप्त केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये एके-47 च्या 30 राउंड, एके-47 रायफलचे एक मॅगझिन आणि एक एचई-36 हँडग्रेनेडचा समावेश आहे.

 

follow us