Donald Trump Praises India’s Election System: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं कौतुक करत अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखीशी संबंधित नियम अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली आहे. भारतात मतदानासाठी फोटो ओळखपत्राच्या वापराचा दाखला देत ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसने ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ मंजूर करण्याचं आवाहन केलं आहे.
फ्लोटिंग-रेट कर्जदारांसाठी मोठी बातमी; बेंचमार्क बदलण्याआधी बँकांना घ्यावी लागणार ग्राहकांची संमती
भारताच्या निवडणूक पद्धतीचा दिला दाखला
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकन प्रशासनाला वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला.
भारत-श्रीलंका कसोटीत खेळाडूला मैदानातच दुखापत, थेट रुग्णालयात हलवलं
या संदर्भात ट्रम्प यांनी भारतातील मतदान प्रक्रियेचा उल्लेख करत मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फोटो आयडीच्या नियमांकडे लक्ष वेधलं.
भारतात 64 कोटींहून अधिक मतदारांचा सहभाग
ट्रम्प यांच्या पोस्टनुसार, भारतातील मागील सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 64 कोटी 60 लाख लोकांनी मतदान केलं. यातील एक टक्क्यांपेक्षा कमी मतदान पोस्टल मतदानाच्या माध्यमातून झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
भारतामध्ये मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे वैध फोटो ओळखपत्र असतं, असा दावा करत ट्रम्प यांनी अमेरिकेतही अशाच प्रकारच्या नियमांची आवश्यकता असल्याचं म्हटलं.
‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ मंजूर करण्याचं आवाहन
अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत मतदार ओळख आणि मतदानाच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी ट्रम्प यांनी ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकन काँग्रेसने हा कायदा लवकर मंजूर करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
फडणवीस विरुद्ध तावडे ते यूपीची कमान; 7 वर्षांत तावडेंचा राजकीय प्रवास कसा बदलला?
भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा थेट संदर्भ देत ट्रम्प यांनी अमेरिकेतील निवडणुकांच्या नियमांवर भाष्य केल्याने त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भारतातील मतदान पद्धतीचा दाखला देत त्यांनी अमेरिकेसाठी अधिक कडक ओळख पडताळणीच्या नियमांची मागणी केली आहे.
