Breaking : दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; बराच वेळ जमीन हादरली

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR)भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भागात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे 10 सेकंद पृथ्वी हादरत असल्याची माहिती समजली आहे. जमीन हादरल्यामुळं लोक घाबरून घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीसह हरियाणा(Hariyana), पंजाब(Panjab), उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. Raj […]

Earthquake

Earthquake

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR)भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भागात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे 10 सेकंद पृथ्वी हादरत असल्याची माहिती समजली आहे. जमीन हादरल्यामुळं लोक घाबरून घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीसह हरियाणा(Hariyana), पंजाब(Panjab), उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Raj Thackeray : सौदीत भोंगे बंद होतात… मग भारतात मोदी का करत नाही?

आज रात्री 10:20 च्या सुमारास बहुतेक लोक झोपण्याच्या तयारीत व्यस्त होते. मग अचानक पृथ्वी हादरायला लागली. प्राथमिक माहितीत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती नाही. दिल्ली-एनसीआरमधील उंच इमारतींमध्ये लोक प्रचंड घाबरले. लोक त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. यावेळी भूकंपाची वेळही थोडी जास्त होती आणि एकापाठोपाठ दोन धक्के बसले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे.

नोएडामध्ये लोक घरातून खाली उतरून बागेमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. भूकंप इतका जोरदार होता की लोकांमध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलंय.

Exit mobile version