Venezuela Earthquake : जगभरातील अनेक देश भूकंपांच्या सौम्य धक्क्यांनी हादरले असून व्हेनेझुएला (Venezuela Earthquake) आणि जपानच नाही तर भारतातील जम्मू काश्मीरच्या जमीनीलाही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आलीयं. गुरुवारी पहाटेच्या दरम्यान जगभरातील अनेक देशांना भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर येत असून जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहितीही राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आलीयं. रिश्टर स्केलवर भूकंपाच्या सौम्य धक्क्याची तीव्रता 3.5 इतकी आहे. भूकंपाच्या या सौम्य धक्क्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची आत्तापर्यंत समोर आलेली नाही.
EQ of M: 3.5, On: 25/06/2026 02:36:49 IST, Lat: 33.913 N, Long: 75.095 E, Depth: 15 Km, Location: Pulwama, Jammu and Kashmir.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @DrNKalaiselvi @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/DbAmGRu3rx— National Center for Seismology (@NCS_Earthquake) June 24, 2026
दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएलामध्ये एकापाठोपाठ दोन भूकंप झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 7.2 आणि 7.5 इतकी आहे. भूकंपामुळे राजधानी कॅराकसमध्ये इमारती ढासळल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील 10 वर्षांतील सर्वाधिक शक्तीशाली भूकंप झाल्याचं बोललं जात आहे.
भूकंपामुळे व्हेनेझुएलामधील 22 मजली इमारत कोसळली असून यासोबतच इतर अनेक इमारती ढासळल्या आहेत. भूकंपाची घटना घडल्यानंतर नागरिक भर रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसून आले आहेत. भूकंपाच्या घटनेनंतर व्हेनेझुएलामध्ये आपत्तकालीन परिस्थिती घोषित करण्यात आली असून प्रशासनाकडून बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. तर व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपतींकडून आणीबाणी जाहीर करण्यात आलीयं.
दरम्यान गुरुवारी पहाटे नेपाळमध्ये ३.८ तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले आहेत. हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) पहाटे ५ वाजून २१ मिनिटे ४३ सेकंदांनी झाला. याआधी रविवारीही नेपाळच्या दुर्गम आणि डोंगराळ अशा हुमला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रतेचा भूकंप दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी झाला होता आणि त्याचे केंद्रबिंदू हुमला जिल्ह्यातील श्रीनगर भागात होते. मात्र, यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
