EC Withdraws SIR Declaration From : विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी भरल्या जाणाऱ्या Form-6 सोबत अतिरिक्त घोषणा पत्र अर्थात Annexure-D देणे अनिवार्य नसेल असे आयोगाने स्षष्ट केले आहे. ज्या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या राज्यांमध्ये Form-6 मधून Annexure-D हटवून त्याचे मूळ स्वरूप पुन्हा लागू करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, वैधानिक Form-6 च्या मूळ स्वरूपात कोणताही कायदेशीर बदल करण्यात आलेला नाही. मात्र, SIR प्रक्रियेदरम्यान Form-6 सोबत अतिरिक्त घोषणा पत्र जोडण्यात आल्याने या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले होते.
SIR नोंदणीसाठी व्हॉट्सअॅप, ई-मेल्सचे पुरावे ग्राह्य धरा…एस. चोकलिंगम यांचे आदेश
काय होता वाद?
SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांना Form-6 भरताना अतिरिक्त घोषणा पत्र म्हणजेच Annexure-D जोडणे आवश्यक करण्यात आले होते. त्यामुळे मूळ Form-6 आणि SIR प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या Form-6 मध्ये फरक निर्माण झाला होता. या अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता आणि त्यामागील प्रक्रियेवरून चर्चा सुरू झाली. आता आयोगाने ज्या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथे ऑनलाइन Form-6 मधून Annexure-D काढून टाकले आहे. त्यामुळे मतदारांना पुन्हा पूर्वीच्या पद्धतीने Form-6 भरता येणार आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय
नव्या निर्णयानुसार मूळ Form-6 ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे. म्हणजेच नवीन मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त घोषणा पत्राची आवश्यकता भासणार नाही. विशेष म्हणजे, मूळ Form-6 आणि SIR दरम्यान वापरण्यात आलेल्या Form-6 मधील घोषणापत्राच्या बाबतीत काही महत्त्वाचे फरक होते. त्यामुळे आयोगाने आता जुन्या स्वरूपातील Form-6 पुन्हा उपलब्ध करून दिल्याने अर्ज प्रक्रिया पूर्वीच्या पद्धतीने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयोगाच्या निर्णयाकडे का लक्ष?
SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत Form-6 सोबत Annexure-D अनिवार्य नसल्याचे स्पष्ट होणे हा मतदारांसाठी महत्त्वाचा बदल मानला जात आहे. मात्र, हा बदल SIR प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यातील सध्याची प्रक्रिया आणि लागू असलेल्या सूचनांची स्वतंत्रपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.
STORY | EC withdraws SIR declaration from Form 6 in states where exercise is over
The Election Commission has withdrawn the additional SIR-related declaration from the online voter enrolment Form 6 in states where the Special Intensive Revision of electoral rolls has been… pic.twitter.com/FiFk75mX36
— Press Trust of India (@PTI_News) September 30, 2026
