Download App

मोठी बातमी, LoC वर IED स्फोट; एका अधिकाऱ्यासह दोन लष्करी जवान शहीद

IED Blast On LoC : जम्मूमधील अखनूर येथे एलओसीवर झालेल्या स्फोटात दोन लष्करी जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

IED Blast On LoC : जम्मूमधील अखनूर येथे एलओसीवर (LoC) झालेल्या स्फोटात दोन लष्करी जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर या स्फोटात (Blast) एक जवान जखमी झाला असल्याची माहितीसमोर आली आहे.

माहितीनुसार, दोन्ही सैनिकांची प्रकृती गंभीर होती. त्यांना उपचारांसाठी विमानाने हलवण्यात आले होते मात्र दोन्ही जवान शहीद झाले. शहीद सैनिकांमध्ये कॅप्टन केएस बक्षी आणि शिपाई मुकेश यांचा समावेश आहे. सीमा गस्त घालत असताना अखनूर सेक्टरमधील लालेली येथे झालेल्या स्फोटात दोन्ही सैनिक शहीद झाले. या घटनेनंतर लष्कराचे जवान परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. या संदर्भात माहिती देताना लष्कराने म्हटले आहे की, व्हाईट नाईट कॉर्प्स दोन शूर सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करते आणि श्रद्धांजली अर्पण करते.

शोध मोहीम सुरू

लष्कराने स्फोटात सैनिकांच्या शहीद होण्याची माहिती दिली आहे आणि परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही सैनिक गस्तीवर होते . दुपारी 3.50 च्या सुमारास भट्टल परिसरातील अग्रेषित चौकीजवळ शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात जवान जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात एका कॅप्टनसह दोन सैनिकांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच अन्… , आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

follow us