ED Filed Case Against BBC : केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने बीबीसीवर कारवाई सुरू केली आहे. विदेशी निधीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह बीबीसीच्या भारतातील अनेक कार्यालयांमध्ये आयकर विभागाने सर्वेक्षण केले होते. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता बीबीसीवर मोठी कारवाई केली आहे.
Enforcement Directorate has filed a case against BBC under Foreign Exchange Management Act for irregularities in foreign funding: ED pic.twitter.com/NSsv4zoZW5
— ANI (@ANI) April 13, 2023
ईडीने बीबीसीविरुद्ध विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत विदेशी निधीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बीबीसी तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्यातच आयकर विभागाने दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील बीबीसीच्या कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. बीबीसीने गुजरात दंगल आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींवर डॉक्युमेंटरी बनवली होती. या डॉक्युमेंट्रीमुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर केंद्राकडून ही डॉक्युमेंट्री यूट्यूबसह सोशल मीडियावरून हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या.