Download App

पेटीएमला मोठा धक्का: पेटीएम पेमेंट्स बँकेची ईडीकडून चौकशी, शेअर्समध्ये घसरण

Paytm Crisis : पेटीएमला (Paytm Crisis) मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पेटीएम पेमेंट्स बँकेवरील (Paytm Banking Service) आरोपांची चौकशी सुरू केली आहे. ईडीने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध प्राथमिक तपास सुरू केला आहे आणि आज ही बातमी येण्यापूर्वी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. पेटीएम विरुद्ध ईडीच्या मोठ्या कारवाईचा एक भाग म्हणून पेटीएम पेमेंट्स बँकेवरील आरोपांबाबत तपास सुरू केला आहे.

पेटीएमचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला
Paytm ब्रँडची मूळ कंपनी One97 Communications Limited च्या शेअर्समध्ये पुन्हा 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे तो लोअर सर्किटवर पोहोचला. या घसरणीनंतर आज पेटीएमचे शेअर्स पुन्हा सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला आहे. शेअर्सने आज प्रति शेअर 342.15 रुपयांची नीचांकी पातळी गाठली, गेल्या 52 आठवड्यांमधील ही नीचांकी पातळी आहे.

पेटीएमचे शेअर्स एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत
One97 Communications चे शेअर्स दोन्ही प्रमुख बाजारांवर प्रथमच 350 रुपयांच्या खाली आले आहेत आणि हे त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 55 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. ऑक्टोबरमध्ये पेटीएम शेअर्सची पातळी 761.20 रुपये होती आणि पेटीएमची आजची नीचांकी पातळी 342.15 रुपये आहे, म्हणजेच पेटीएम शेअर्सच्या किमतीत थेट 55 टक्के घट झाली आहे.

मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी : शिंदेंना दिल्लीत मिळणार ‘हुशार’ चेहरा

पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईचा आढावा घेण्यास RBI चा नकार
पेटीएमचे शेअर्स मंगळवारी पहिल्यांदा 400 रुपयांच्या खाली दिसले आणि आज ते 350 रुपयांच्या खाली गेले. सध्या, पेटीएमसाठी सर्वांगीण अडचणींचा काळ असल्याचे दिसते आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारी पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध कोणत्याही कारवाईचा आढावा घेण्यास नकार दिला होता. अशाप्रकारे, आरबीआय आपल्या निर्णयावर पुनर्विचार करेल आणि फिनटेक कंपनीला काहीसा दिलासा मिळेल ही पेटीएमची आशाही संपूष्टात आली आहे.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी अन् अजित गोपछडे होणार खासदार! भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

जाणून घ्या RBI ने काय कारवाई केली
31 जानेवारीला संध्याकाळी पेटीएमला मोठा धक्का बसला. भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बहुतांश सेवा बंद करण्याचे आदेश दिले. या अंतर्गत आरबीआयने पेटीएमच्या युनिट पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) ला 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहक खात्यात, प्रीपेड उत्पादन, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारू नयेत असे निर्देश दिले होते.

Valentine Day : सर्वाधिक भारतीय कोणत्या भाषेत देतात प्रेमाची कबुली? उत्तर ऐकूण व्हाल शॉक!

follow us