तिसऱ्यांचा ईडीची नोटीस; चौकशीसाठी बोलविले पण अरविंद केजरीवालांनी दिल्ली सोडली

ED Summons Arvind Kejriwal: मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पाठीशी ईडीचा (ED)चा ससेमिरा लागला आहे. आता केजरीवाल यांना तिसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी नोटीस (समन्स) बजाविले आहे. केजरीवाल यांना तीन जानेवारीला चौकशीसाठी बोलविले आहे. पण केजरीवाल हे सध्या दिल्लीत नाहीत. ते विपश्यनासाठी पंजाबला गेले आहे. तेथेच ते दहा दिवस राहणार असल्याचे वृत्त आहे. अशोक […]

'भाजपकडून ऑपरेशन लोट्स सुरु' विश्वासदर्शक ठराव जिंकत केजरीवालांचा प्रहार

Arvind Kejriwal

ED Summons Arvind Kejriwal: मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पाठीशी ईडीचा (ED)चा ससेमिरा लागला आहे. आता केजरीवाल यांना तिसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी नोटीस (समन्स) बजाविले आहे. केजरीवाल यांना तीन जानेवारीला चौकशीसाठी बोलविले आहे. पण केजरीवाल हे सध्या दिल्लीत नाहीत. ते विपश्यनासाठी पंजाबला गेले आहे. तेथेच ते दहा दिवस राहणार असल्याचे वृत्त आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येणारच ? बावनकुळेंचा हवाला देत प्रताप चिखलीकरांचा दावा

यापूर्वी मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांना 18 डिसेंबरला, 21 डिसेंबरला समन्स बजाविण्यात आले होते. परंतु केजरीवाल हे चौकशीसाठी गेले नाहीत. ते पंजाबमधील होशियापूर येथे दहा दिवसांच्या विपश्यनासाठी गेले होते. याप्रकरणी केजरीवाल यांना पुन्हा समन्स आले आहे. ते पुन्हा पंजाबमध्ये जाणार आहेत. ईडीच्या समन्सवर केजरीवाल म्हणाले, मी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहेत. परंतु इडीचे समन्सही बेकायदेशीर आहेत. हे समन्स राजकीयदृष्या प्रेरित आहेत. त्यामुळे त्या मागे घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे.

Siddheshwar Yatra : संमती पोथी वाचणाचा वाद कोर्टात, यंदा कोण करणार संमती वाचन?

ईडीच्या चार्जशिटमध्ये केजरीवालांचे नाव
मद्य घोटाळ्याप्रकरणात केजरीवाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले मनिष सिसोदिया हे अटकेत आहेत. त्यांना अद्यापही जामिन मिळालेला नाही. तर ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केजरीवाल यांचे नाव आहे. या मद्य घोटाळ्यात ईडीबरोबर सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सीबीआयने चौकशीसाठी बोलविले होते. परंतु केजरीवाल हे चौकशीसाठी जात नाहीत. केजरीवाल यांना आता ईडी मनी लॉड्रिंग प्रकरणात पीएमएलए कायद्यानुसार समन्स काढण्यात आले आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. संजय सिंह यांचे घर आणि कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. तसेच सिंह यांचे निकटवर्तीय अजित त्यागी यांना मद्य धोरणामुळे फायदा झाल्याचे म्हटले आहे. या दोघांविरोधात 270 पानाचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहेत. यात माजी उपमुख्यमंत्री मनिष सोसादिया हे मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version