‘और कहो पनौती…’, ‘राजकारणातील पनौती पप्पू’; तीन राज्याच्या निकालावरून मजेशीर मिम्स

election result 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. यानंतर राजस्थानमधील बायतू येथे एका निवडणूक सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पनौती म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान, छत्तीसगड ही राज्य काँग्रेसच्या हातातून […]

'और कहो पनौती...', 'राजकारणातील पनौती पप्पू; तीन राज्याच्या निकालावरून मजेशीर मिम्स

election result 2023

election result 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. यानंतर राजस्थानमधील बायतू येथे एका निवडणूक सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पनौती म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान, छत्तीसगड ही राज्य काँग्रेसच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. यावरूनच भाजप नेते सीटी रवी यांनी राहुल गांधींना टोला लगावला. आता सगळ्यात मोठी पनौती कोण, असा असा त्यांनी केला.

तेलंगणात ओवेसींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, मुस्लीम व्होटबँक कोणाच्या पारड्यात?

छत्तीसगडमध्ये भाजप 55 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. तर तेलंगणात काँग्रेसचे 63, भारत राष्ट्र समिती (BRS) चे 42 आणि भाजपचे 9 उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात भाजप 162 जागांवर तर काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्येही अशोक गेहलोत यांची जादू चालताना दिसत नाही. भाजप 112 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे. यावरून

सीटी रवी यांनी ‘एक्स’ अकाउंटवरून याबाबत ट्विट केले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचा उल्लेख करत सीटी रवी यांनी आता सगळ्यात मोठी पनौती कोण, असा सवाल केला.

रोड शो अन् सभा गाजल्या! लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये ‘मोदी फॅक्टर’ ठरला गेमचेंजर 

तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल यांना लक्ष्य केलं. पनौती हा शब्द राहुल गांधी यांनी उच्चारला होता. पण खरी पनौती कोण आहे, हे जनतेनं दाखवून दिलं, असा खोचक टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदींबद्दल चुकीचे शब्द बोलणे लोकांना मान्य नाही. देशातील प्रत्येक मतदार नरेंद्र मोदींना मतदान करत आहे. मी महिला मतदारांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे मोठ्या संख्येने मतदार उभे आहेत. हे आजच्या निकालात दिसून आल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

याशिवाय, या तीन राज्यांतील आतापर्यंतचे ट्रेंड भाजपचे वर्चस्व दर्शवतात. दरम्यान, सोशल साइट X वर अनेक वापरकर्त्यांनी देखील निकालाच्या ट्रेंडवर मीम्स शेअर केले आहेत. एका युजर्नले लिहिलं की, खेळ आणि क्रिकेट यातील पनौती साहेब, तर राजकारणातील पनौती पप्पू…

तर आणखी एका युजर्नसे टि्वट करत लिहिलं की, और बोलो पनोती…. और जनाब इलेक्शन मे क्या चल रहा है, मोदी की गॅरंटी चल रही है, असं लिहिलं.

तीन राज्ये काँग्रेसच्या हातातून निसटत आहेत. राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर वारंवार केलेले हल्ले हे या मागचं कारण असल्याचं दिसून येतं. काही वर्षांपूर्वी गुजरात निवडणुकीदरम्यान सोनिया गांधी यांनी मोदींना मौत के सौदागर म्हटल होतं. त्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली. तर तोच परिणाम आता उत्तरेकडील तीन राज्यांच्या निकालातही दिसून येतो. मोदींवर वैयक्तिक हल्ला हे विरोधकांसाठी संकट असल्याचे यावरून दिसून येते. कर्नाटकात काँग्रेसने मोदींवर हल्ला करण्याचे टाळले आणि त्याचा फायदा त्यांना झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने यातून धडा घ्यावा, असेही राजकीय जाणकार सांगत आहेत.

Exit mobile version