Morarji Desai : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते मोरारजी देसाई यांची आज सोमवार (दि. १०) रोजी पुण्यतिथी आहे. भारताचे चौथे पण पहिले बिगर काँग्रेसचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांनी सर्वात वयस्कर ८४ व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. १९७७ ते १९७९ अशी दोन वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे.
खरंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर १९६६ मध्ये मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, तेव्हा इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले. तर मोरारजी देसाई यांच्याकडे उपपंतप्रधान तसेच अर्थमंत्री पद सोपवण्यात आले. पुढे १९६९ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बरोबर मोरारजी देसाई यांचे मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिला.
भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर मोरारजी देसाई यांनी चीन आणि पाकिस्तान बरोबर आपले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच १९७१ ला भारत-पाकिस्तान युद्धासारखा सशस्त्र संघर्ष टाळण्यासाठी संकल्प केला. त्यामुळेच मोरारजी देसाई यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा १९९० साली पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च देऊन सन्मान केला.
१९६६ ते १९७७ असे सलग ११ वर्षे इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले. परंतु, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या या शेवटच्या काही वर्षांत देशात आणीबाणी लावली. ही आणीबाणी १९७७ ला उठवण्यात आली. तेव्हा इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. तर विरोधी पक्षांनी जनता पक्षाने इंदिरा गांधी यांच्या विरोधात मोठा लढा दिला होता. त्यानंतर जनता पक्षाने काँग्रेसला या निवडणुकीत हरवले आणि मोरारजी देसाई यांना पंतप्रधान पदी सर्वमताने निवडण्यात आले.
शिंदे यांचा अयोध्या दौरा गाजला! पण सत्तार आणि बच्चू कडू यांनी का दांडी मारली? – Letsupp
मोरारजी देसाई यांचा जन्म तेव्हाचे (ब्रिटिश काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी) गुजरात राज्यातील वलसाड (बुलसर) जिल्ह्यातील भदेली या गावात झाला. आठ भावंडांपैकी ते सर्वात मोठे होते. त्यांचे वडील शिक्षक होते. मोरारजी देसाई यांनी सुरुवातीपासून महात्मा गांधी यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना बराच काळ तुरुंगवास झाला. परंतु, नेतृत्व कौशल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत तर नंतर गुजरात राज्यातील एक महत्वाचे नेते म्हणून उदयास आले.
राजकारणाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील काम केले आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेत सन १९८० साली मोरारजी देसाई यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. १० एप्रिल १९९५ मध्ये वयाच्या ९९ व्या वर्षी मोरारजी देसाई यांचे निधन झाले.