Budget 2023 : भारताने बनवललेया यूपीआय, कोविन ऍपमुळे जगानं भारताचं महत्त्व मान्य केलं. (Budget 2023) सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून गौरव करण्यात आला. गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे. भारतानं १०२ कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केलं. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या म्हणाल्या की, अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जगाने भारताची ताकद ओळखली आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली. कोरोना काळातही अर्थव्यवस्था मजबूत, देश थांबला नाही. भारतीय अर्थव्यवस्था चमकता तारा आहे. पीएम अन्नपूर्ण कौशल्य योजनेची सुरुवात होणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.
भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पीपीपी, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी पर्यटन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. पर्यटना विकासाला प्राधान्य दिलं. आम्ही मिशन मोडवर त्यावर काम केलं, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.