आधी लुटा मग शिक्षेविनाच सुटका, चोक्सीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा व भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली असल्याने चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान एकीकडे चोक्सीला दिलासा मिळाला आहे मात्र यामुळे आता भारताची डोकेदुखी वाढणार आहे. कारण […]

Untitled Design   2023 03 21T163125.578

Untitled Design 2023 03 21T163125.578

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा व भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली असल्याने चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान एकीकडे चोक्सीला दिलासा मिळाला आहे मात्र यामुळे आता भारताची डोकेदुखी वाढणार आहे. कारण यामुळे या कर्जबुडव्याला आता भारतात घेऊन येणे कठीण होऊन बसणार आहे. दरम्यान या मुद्द्यावरून आता काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, विपक्ष को ED-CBI, मित्र को रिहाई! ‘मोडानी मॉडल’ मतलब पहले लूटो, फिर बिन सज़ा के छूटो। अशा शब्दात गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान याच अनुषंगाने काँग्रेसचे खरगे यांनी देखील यावरून भाजपवर टीका केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले की, “विरोधी नेत्यांसाठी ED-CBI, पण मोदींची “आमच्या मेहुल भाई”साठी इंटरपोलमधून सुटका! जेव्हा “बेस्ट फ्रेंड” साठी संसद ठप्प होऊ शकते, तर 5 वर्षांपूर्वी फरार झालेला “जुना मित्र” त्याला मदत करण्यास नकार कसा देणार? हजारो-कोटींचा देश बुडाला, ‘मी तुम्हाला खायला देणार नाही’ हे अनोखे वाक्य ठरले!

रेड नोटीस म्हणजे काय? जाणून घ्या
2018 साली पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी सीबीआयने गुन्ह्याची नोंद केली मात्र त्या आधीच मेहुल चोक्सी देश सोडून पळून गेला. दरम्यान रेड नोटीस म्हणजे काय हे आपण पाहू…एखाद्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला व संबंधित व्यक्ती देश सोडून पळून गेली तर त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येते. या नोटीसद्वारे पकडलेल्या व्यक्तीला त्याने गुन्हा केलेल्या देशात परत पाठवले जाते.मात्र आता इंटरपोलने चोक्सीला रेड नोटीस यादीतून बाहेर काढल्याने भारताची डोकेदुखी वाढणार आहे.

Exit mobile version