Download App

मोठी बातमी : लडाखमध्ये लष्करी सरावादरम्यान भीषण अपघात, JOC सह 5 जवान शहीद

दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत.

  • Written By: Last Updated:

Ladakh Tank Accident News : लडाखमधून यावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत. लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने टॅंक पाण्याखाली अडकला. यात पाच जवान वाहून गेले. या सर्वांचे मृतदेह सापडले असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (5 Army personnel feared drowned in Ladakh flash floods during tank exercise)

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लडाखजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवान टँकमध्ये बसून नदी ओलांडण्याचा सराव करत होते. त्यावेळी अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले जात आहे. अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीच टँक बुडाला. यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले असून, सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.

आज (दि.29) शनिवारी पहाटे लडाखमधील न्योमा-चुशूल भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) टी-72 टँकमध्ये भारतीय लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. त्यावेळी अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने टँक बुडाला. हा अपघात लेहपासून 148 किमी अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ पहाटे 1 वाजता लष्करी सरावादरम्यान घडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. घटनेवेळी टँकमध्ये 5 जवान होते.

चीनमुळे भारतीय लष्कर असते अलर्ट मोडवर

1962  मधील भारत-चीन युद्ध आणि नुकतेच पीएलएसोबत झालेला संघर्ष या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला याठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. मात्र, या ठिकाणी गस्त घालणे तितकेच कठीण असते. जून 2020 मध्ये झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनने त्यांचे चार जवान मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं होतं.

follow us