Download App

देशात प्रथमच चॅटजीपीटीच्या मदतीने जामिनावर निर्णय

चंदिगड : देशात प्रथमच एखाद्या न्यायालायाने पहिल्यांदाच हत्या प्रकरणात चॅटजीपीटी (ChatGPT) या आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चॅटबॉटचा (Chatbot) वापर केला आहे. देशात प्रथमच पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने (Punjab and Haryana Courts) चॅटबॉटचा फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत (Bail application)निर्णय घेण्यासाठी वापर केला आहे. न्यायमूर्ती अनूप चितकारा (Justice Anoop Chitkara) यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठाने जून 2020 मध्ये गुन्हेगारी कट, खून दंगल आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीनं दाखल केलेल्या जामीन याचिकेच्या सुनावणीवेळी ChatGPT कडून अभिप्राय मागवला.

एका खुनाच्या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती अनूप चितकारा यांनी जामिनावर जागतिक दृष्टीकोनातून मूल्यांकन करण्यासाठी ChatGPT चा वापर केला आहे. न्या. अनूप चितकारा यांनी आर्टीफिशीअल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटीला प्रश्न केला की, ज्या प्रकरणात हल्लेखोरांनी क्रूर कृत्य केलं आहे, त्या प्रकरणात जामीन देण्याबाबत कायदेशीर कारवाई काय करता येईल?

Sara Ali Khan: नवाब सैफ अली खानच्या मुलीला करायचाय कार्तिकसोबत पुन्हा रोमान्स!

त्यावेळी चॅटजीपीटीने सांगितले की, हल्लेखोरांनी पाशवी कृत्ये केलेल्या परिस्थितीमध्ये जामीनासंबंधीच्या कायदेशीर तत्त्वांवर तीन परिच्छेदांचा समावेश असलेला सखोल प्रतिसाद दिला. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जाची याचिका फेटाळली आहे.

न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की, चॅटजीपीटीचा कोणताही उल्लेख किंवा त्याबाबतच्या केलेल्या टिपण्या, खटल्याच्या गुणवत्तेवर मत व्यक्त करत नाही. न्यायालयाने ट्रायल कोर्टला ChatGPT च्या प्रतिसादाशी संबंधित कोणत्याही निरीक्षणाकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयाने मान्य केले की, याचिकाकर्त्याचा यापूर्वी हत्येच्या प्रयत्नांच्या दोन घटनांमध्ये सहभाग होता.

याविषयी सामाजिक कार्यकर्ते ठाकूर अभिषेक सोम याबद्दल म्हणाले की, वेगवेगळ्या खटल्यांमध्ये जनतेच्या विविध प्रतिक्रीया असतात. तर त्याचा फायदाही होतो आणि तोटाही होता. ते एक पब्लिक चॅटबॉट आहे. त्यामुळे जनता आपली काहीही प्रतिक्रीया देऊ शकते. ती कधी चुकीची असू शकते, तर कधी बरोबरही असू शकते. एखादं प्रकरण देशभरात गाजतं, तेव्हा तशा प्रकारच्या खटल्यामध्ये या चॅटबॉटचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते. त्या प्रकरणामध्ये चॅटबॉटचं मत घेतलं पाहिजे पण सर्वच प्रकरणांमध्ये याचा वापर चुकीचा ठरु शकतो, असही त्यांनी सांगितले.

Tags

follow us