Download App

आमिर खानच्या घरी ‘सितारे जमीन पर’ टीमसाठी म्युझिकल नाईट! दिग्गजांची सरप्राइझ हजेरी

Musical night for ‘s house : 2007 मध्ये प्रचंड यश मिळवलेली ‘तारे जमीन पर’ (Sitare Zameen Par) या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली (Entertainment News) आहे. या पार्श्वभूमीवर आमिर खानने (Aamir Khan) आपल्या निवासस्थानी एक खास म्युझिकल नाईटचे आयोजन केले, जी सर्वार्थाने अविस्मरणीय ठरली.

या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी ( Raj Thackeray and Sachin Tendulkar) लावली, परंतु खरी सरप्राइझ भेट दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी. सचिन यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होत्या. या विशेष क्षणाने उपस्थित सर्वांच्या भावना उंचावल्या.

सुंदर मी होणार… विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर

या म्युझिकल नाईटमध्ये ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातील 10 नवोदित कलाकारांनी आपल्या कुटुंबासोबत सहभाग घेतला. रणबीर कपूर यांनी या सर्व मुलांबरोबर फोटो काढून घेतले, आणि त्यांच्या आयुष्यातील हा क्षण एखाद्या स्वप्नासारखा ठरला. आमिर खान स्वतःही या मुलांबरोबर वेळ घालवत त्यांचे मनोबल वाढवत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनीही मुलांसोबत हजेरी लावली आणि कार्यक्रमाच्या आनंदात सहभागी झाले. या संध्याकाळी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.

‘सितारे जमीन पर’ – नव्या उमेदवारांची चमक

आमिर खान प्रोडक्शन्सचा अभिमानाने सादर करत आहे – 10 नवोदित कलाकार: अरुष दत्ता, गोपीकृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना, ज्यांनी यापूर्वी ‘शुभ मंगल सावधान’ सारखा यशस्वी आणि सामाजिक भिंती तोडणारा चित्रपट दिला आहे, आता आमिर खान प्रोडक्शन्ससोबत ‘सितारे जमीन पर’द्वारे परत येत आहेत.

विमान चुकलं! एकनाथ शिंदे धावले लाडक्या बहिणीच्या मदतीला…जीव वाचला

या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली असून संगीत शंकर-एहसान-लॉय यांचे आहे. स्क्रीनप्ले दिव्य निधी शर्मा यांनी लिहिले आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवी भागचंदका यांनी केली आहे.
‘सितारे जमीन पर’ 20 जून 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

follow us