Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर राजवीर देओलशी लग्न करणार?

Sara Tendulkar Rajveer Deol Wedding Rumor : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Sara Tendulkar Rajveer Deol Wedding Rumor

Sara Tendulkar Rajveer Deol Wedding Rumor : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सारा तेंडुलकर लवकरच लग्न करणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अभिनेते सनी देओलचा 32 वर्षांचा मुलगा राजवीर देओलसोबत ती लग्न करणार असं देखील सांगितलं जात आहे. मात्र याबाबत माहिती घेतली असताना ही बातमी फेक असल्याची माहिती समोर आली आहे. सारा तेंडुलकरच्या जवळच्या एका सूत्राने या दाव्यांचे खंडन करत, त्या केवळ अफवा असल्याचे आणि त्यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने सारा तेंडुलकरच्या (Sara Tendulkar) जवळच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे, “सारा आणि राजवीर (Rajveer Deol) कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत. सारा सध्या अविवाहित असून ती पूर्णपणे तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. या अफवा निराधार आणि त्रासदायक आहेत. सारा या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, कारण तिला आपली प्रतिष्ठा जपायची आहे आणि अत्यंत संयमाने वागायचे आहे.”

लग्नाच्या अफवा कुठून सुरू झाल्या?

सारा आणि राजवीर यांच्या लग्नाबद्दलच्या अफवा सर्वप्रथम ‘रेडिट’ (Reddit) वर सुरू झाल्या आणि त्यानंतर त्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरल्या. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे सांगत, राजवीर देओल 2027 मध्ये सारा तेंडुलकरशी लग्न करणार असल्याचा दावा केला गेला. काहींनी तर असाही दावा केला की, राजवीरने साराला महागड्या भेटवस्तू पाठवायलाही सुरुवात केली आहे. अखेरीस, हे सर्व दावे केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले असून, साराच्या जवळच्या सूत्राने यातील सत्य स्पष्ट केले आहे.

लग्नाबद्दल सारा काय म्हणाली होती?

काही काळापूर्वी एका मुलाखतीत, सारा तेंडुलकरने स्वतःच्या लग्नाबद्दल भाष्य केले होते. तिने सांगितले की, तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरचे लग्न तिच्यासाठी एका ‘ट्रायल रन’ सारखे होते. ती म्हणाली, “मला वाटते की तो माझ्यासाठी एक चांगला सराव होता. आता मला नेमके काय हवे आहे आणि काय नको आहे, हे समजले आहे.”

follow us