Forbes Billionaires List : फोर्ब्सने 2023 या वर्षासाठी श्रीमंतांची यादी (Forbes Billionaires List) जाहीर केली आहे. यामध्ये अदानी-अंबाणींसह 16 नव्या श्रीमंतांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत भारतातील लोकांची संख्या वाढली आहे. तब्बल 169 भारतीयांचा या श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारताचे या यादीमध्ये 30 वे स्थान आहे. तर यावर्षी या यादीमध्ये 16 नव्या श्रीमंतांचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये 3 महिलांचा देखील समावेश आहे.
फोर्ब्सच्या 2023 या वर्षासाठीच्या श्रीमंतांची यादीमध्ये (Forbes Billionaires List) रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर जगातील श्रीमंताच्या तुलनेत ते 9 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे गौतम अदानी (Gautam Adani) हे 24 व्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे या यादीमध्ये तब्बल 99 वर्षांचे उद्योगपति केशब महिंद्रा (Keshab Mahindra) यांच्या नावाचाही समावेश आहे.
यावर्षी या यादीमध्ये 16 नव्या भारतीय श्रीमंतांचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे दिवंगत उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या पत्नी आणि पालोनजी शापोरजी मिस्त्री यांची सून रोहिका सायरस मिस्त्री यांचं. दुसरं नाव राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala Net Worth) आणि तिसऱ्या नंबरवर आहे ती एपीएल अपोलो ट्यूब्सची को-फाउंडर सरोज रानी.
CNG-PNG : केंद्राचा नवा फॉर्मुला, सीएनजी-पीएनजीच्या किंमती दर महिन्याला बदलल्याने ‘हा’ फायदा
त्याचबरोबर या यादीमध्ये भारताततील सर्वा तरूण श्रीमंत म्हणून ब्रोकिंग फर्म झेरोदाचे को-फाउंडर निखिल कामथ (Nikhil Kamat) यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच त्यांचे भाऊ नितिन कामथ (Nitin Kamath)यांचं देखील नाव या यादीमध्ये आहे. गौतम अदानी (Gautam Adani)यांचे भाऊ विनोद अदानी (Vinod Adani)यांचं देखील नाव या यादीमध्ये आहे. तब्बल 99 वर्षांचे उद्योगपति केशब महिंद्रा (Keshab Mahindra) यांच्या नावाचाही समावेश आहे.