From studying in London to Kejriwal’s confidant joining BJP; How is Chaddha’s journey : आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामध्ये राघव चढ्ढा यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा आपला निर्णय जाहीर केला. मात्र यानंतर ते केजरीवालांचे विश्वासू असताना थेट भाजपची वाट त्यांनी कशी धरली? राघव चढ्ढा यांचा राजकीय प्रवास कसा आहे? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. जाणून घ्या सविस्तर…
राघव चढ्ढा यांचं कुटुंब हे मुळचं पंजाबमधील जालंदर येथील आहे. मात्र अनेक दशकांपासून ते दिल्लीमध्ये स्थायिक झालेले आहेत.चढ्ढांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शिक्षण घेतले त्यानंतर 2009 मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बी कॉम ची डिग्री मिळवली आणि 2018 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाकडून सीएची पदवी प्राप्त केली त्यामुळे ते व्यवसायाने सीए आहेत. तसेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काही काळ लंडनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेतलं.
त्याचवेळी 2013 मध्ये जेव्हा अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन शेवटच्या टप्प्यात होतं त्यावेळी व्यवसायाने सीए असलेले चढ्ढा हे शिक्षण घेऊन भारतात परतले होते. त्याचवेळी त्यांची ओळख अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झाले त्यानंतर ते आम आदमी पक्षामध्ये दाखल झाले आणि केजरीवालांनी त्यांना पहिली असानमेंट दिली ती दिल्ली जनलोकपालचा ड्राफ्ट तयार करणारे अधिवक्ता राहुल मेहरा यांना असिस्ट करण्याची त्यानंतर चढ्ढा हे पक्षाचा सर्वात तरुण चेहरा आणि टीव्हीवर दिसणारा पक्षाचा चेहरा बनले होते.
तसेच त्यांनी 2013 मध्ये आपच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत काम केले. दिल्ली सरकारमधील माजी अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले. ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्ली जल बोर्डचे अध्यक्ष देखील होते.त्यांच्या अशाच एक ना अनेक कामाची पावती म्हणून त्यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण दिल्लीतून बाजपच्या रमेश बिधूरी यांच्या विरूद्ध आपने तिकीट दिलं मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मात्र अखेर त्यांना 2020 मध्ये दिल्ली विधानसभेमध्ये राजेंद्रनगर मतदारसंघात यश मिळालं आणि ते आमदार झाले. त्यानंतर 2022 पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी आपने चड्डा यांना पंजाबचा सह-प्रभारी म्हणून पाठवलं तेव्हा त्यांनी पंजाबमदील आपच्या ऐतिहासिक विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना राज्यसभेवर सदस्य बनण्याची संधी मिळाली.
आता पाहूयात चढ्ढांकडे किती संपत्ती आहे नुकत्याच त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून निवडणुकीला उभे राहिल्यानंतर दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे यांच्याकडे 36 लाख रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. यामध्ये त्यांच्याकडे स्विफ्ट कार आहे. तर 2020 मध्ये त्यांच्याकडे 19 लाख रुपयांची संपत्ती होती. गुन्ह्यांबद्दल सांगायचं झालं तरी त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मानहानी आणि सार्वजनिक गैरवर्तन यांचा समावेश आहे. कोणत्याही प्रकरणात त्यांना शिक्षा झालेली नाही.
त्याचबरोबर त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा विवाह बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यांनी दोघांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांची ओळख लंडनमध्ये एका कार्यक्रमात झाली होती त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सर्वोत्तम कांमांसाठी पुरस्कार मिळाले होते. मात्र त्यांची ही ओळख मैत्री आणि मैत्रीनंतर खास नात्यात बदलली. चमकीला या चित्रपटाच्या सेटवर ते वारंवार भेटत होते. त्यानंतर वाढलेल्या जवळीकीनंतर त्यांनी 2023 मध्ये राजस्थान मधील उदयपूर या ठिकाणी खास विवाह सोहळ्यात लग्न गाठ बांधली.
तर गेल्या काही महिन्यांपासून राघव चढ्ढा यांनी त्यांची ओळख ही संसदेच्या सभागृहात सामान्यांचे प्रश्न मांडणारा एक तरुण चेहरा जो कधी पितृत्व रजेचा अधिकार मागतो, तर कधी विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाची काळजी करतो. अशी बनवली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ती म्हणजे त्यांच्या बाजप प्रवेशाची मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झालं की, चढ्ढा यांचा रस्ता तोच होता. ज्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
