G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. या परिषदेमध्ये जी 20 राष्ट्रांनी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी दिली आहे. यामध्ये तब्बल 112 मुद्दे समाविष्ट आहेत. हे नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र काय आहे? जाणून घेऊ…
ओएनजीसीमध्ये 2500 जागांसाठी जंबो भरती, अर्ज प्रक्रियेला सुरूवात, वाचा कोण करू शकतं अर्ज?
काय आहे नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र ?
या परिषदेमध्ये जी 20 राष्ट्रांनी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी दिली आहे. यामध्ये तब्बल 112 मुद्दे समाविष्ट आहेत. हे आतापर्यंतचे सर्वात विस्तृत आणि व्यापक घोषणापत्र असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या परिषदेच्या तुलनेत सर्वात जास्त मुद्द्यांवर संमती देण्यात आली आहे. यामध्ये कोण-कोणते मुद्दे आहेत? या बद्दल देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली.
Riteish Deshmukh: रितेश देशमुखने घेतला देशाच्या नावांबद्दल पोल; चाहत्यांनी दिली ‘या’ नावाला पसंती?
नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्रात कोण-कोणते मुद्दे ?
G20 शिखर संमेलनामध्ये एक धरा, एक परिवार आणि एक भविष्य यावर जोर देण्यात आला आहे. तसेच हरित विकासावर देखील यामध्ये भर देण्यात आला. तसेच दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या घोषणापत्रामध्ये सांगितले आहे की, कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला जाणार नाही. तसेच बहुपक्षीयतेला पुन्हा जिवंत करण्यात येईल.
त्यासाठी मजबूत टिकाऊ आणि सर्वसमावेशक विकासावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसेच दक्षिणी देशांच्या प्रधान्यतेवर भार देण्यात येईल. हरित विकासावर देखील यामध्ये भर देण्यात आला. विकसनशील राष्ट्रांवर लक्ष देण्याचे ठरवण्यात आले. 21 व्या शतकातील आव्हानं आणि क्रिप्टो आणि चलनासंबंधित समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली.
तर यावेळी ही बैठक सुरू होताच एक महत्वाची घडामोड घडली. आफ्रिकन युनियनला (African Union) G20 मध्ये सहभागी करून घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आज याबाबत घोषणा केली. मोदींच्या घोषणेनंतर आता G20 चे नाव बदलून G21 करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
तसे पाहिले तरी आफ्रिकन युनियनमध्ये 55 देश सहभागी आहेत. आता युनियनचे G20 समूहात (G20 Summit) सहभागी होणे अतिशय महत्वाचे मानले जात आहे. यावेळी मोदी म्हणाले, जगाच्या कल्याणासाठी आता आपल्या सगळ्यांना एकत्रित येत वाटचाल करण्याची गरज आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या स्वागताच्या भाषणात विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.