Download App

गौतम अदाणी पुन्हा टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत, एका दिवसात 55000 कोटी कमावले

  • Written By: Last Updated:

List of richest people in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्लूमबर्गने (Bloomberg) ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपतींचाही समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीत 13व्या स्थानावर आहेत. तर उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा पुन्हा 20 श्रीमंतांच्या नावांमध्ये समावेश झाला आहे.

‘पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं’; धनंजय मुंडेंनी सांगितली अंदर की बात 

अदानी यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्यानं ते जगातील 20 श्रीमंतांच्या यादीत त्यांचा पुन्हा एकदा समावेश झाला आहे. हिंडेनबर्ग प्रकरणाममुळं उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले होते.
मात्र, मंगळवारी अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सने 20 टक्क्यांनी उसळी घेतली होती. अदाणी पॉवरपासून अदानी एंटरप्रायझेसपर्यंत जोरदार वाढ झाली आणि शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे समूहाच्या मार्केट कॅपवरही परिणाम झाला आणि तो 11 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला. एवढेच नाही तर मंगळवारी अदाणींच्या गुंतवणूकदारांना चांगलाच वेळ मिळाला आणि त्यांच्या संपत्तीत 1.2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आणि अदाणी यांनी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान पटकावलं.

‘पृथ्वीराज चव्हाणांची वक्तव्य अतिशय बालिशपणाची’, सुनील तटकरेंचा जोरदार प्रत्युत्तर 

त्यांची संपत्ती एका दिवसात 50,000 कोटींच्या पुढे गेली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदाणी यांची एकूण संपत्ती $66.7 अब्ज झाली आहे आणि ते सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 19 व्या क्रमांकावर आहेत.

अदाणींच्या संपत्तीत ६.५ अब्ज डॉलरने वाढ
अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांच्या वाढीमुळे, अध्यक्ष गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये $6.5 अब्ज किंवा सुमारे 54,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गौतम अदाणी यांच्या संपत्तीत या वाढीनंतर त्यांची एकूण संपत्ती $66.7 बिलियन झाली आणि ते 19 वे श्रीमंत व्यक्ती बनले. एवढेच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांचा दर्जाही वाढला असून रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदाणी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बनले आहेत.

अदाणी यांच्या एकूण संपत्तीत झालेली वाढ ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे. उल्लेखनीय आहे की 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहाबाबत एक अहवाल प्रकाशित केला होता, ज्यामध्ये समूहावर कर्ज आणि कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत हेराफेरीसह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.

या अहवालाचा गुंतवणूकदारांच्या भावनेवर इतका वाईट परिणाम झाला की, जगातील पहिल्या 3 अब्जाधीशांपैकी अदाणीदोन महिन्यांतच टॉप 30 मधून बाहेर पडले. या कालावधीत, अदानी स्टॉक्स 85 टक्क्यांनी घसरले आणि त्यांची एकूण संपत्ती 60 अब्ज डॉलरने कमी झाली.

जगातील नंबर 1 सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क

इतर अब्जाधीशांबद्दल बोलायचे तर, टेस्ला आणि ट्वीटरसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क अजूनही श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. मस्क $228 अब्ज संपत्तीसह जगातील नंबर-1 सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यानंतर, Amazon चे जेफ बेझोस 171 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत आणि 167 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांची संपत्ती 89.5 अब्ज डॉलर्स असून ते श्रीमंतांच्या यादीत १३व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 89.5 अब्ज आहे. अंबांनींच्या संपत्तीत यावर्षी 2.34 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Tags

follow us