George Kovoor : जॉर्ज कोवूर पार्ले बिस्किट्सचे नवीन सीईओ; आजपासून स्वीकारणार सूत्रे

George Kovoor :  पार्ले बिस्किट्सचे नवीन सीईओ म्हणून जॉर्ज कोवूर यांनी 1 सप्टेंबर 2026 पासून सूत्रे स्वीकारली आहे. याबाबत कंपनीकडून अधिकृत

George Kovoor

George Kovoor

George Kovoor :  पार्ले बिस्किट्सचे नवीन सीईओ म्हणून जॉर्ज कोवूर यांनी 1 सप्टेंबर 2026 पासून सूत्रे स्वीकारली आहे. याबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. भारतात पार्ले बिस्किट्स कंपनी पार्ले-जी (Parle-G), मोनॅको (Monaco), हाईड अँड सीक (Hide & Seek) आणि मेलोडी (Melody) यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सची निर्मिती करते. कंपनीचे नवीन सीईओकडे पेप्सिकोमधील (PepsiCo) तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.  तिथे त्यांनी भारत आणि इतर विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या वाढीशी संबंधित धोरणांची जबाबदारी सांभाळली होती.

जॉर्ज कोवूर कोण आहेत?

जॉर्ज कोवूर हे एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील एक अनुभवी व्यावसायिक नेते आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी ‘आस्क गेको ॲडव्हायझरी एलएलपी’ (Ask Gecko Advisory LLP) ही संस्था स्थापन केली आणि त्यात भागीदार बनले. कोवूर यांची पेप्सिकोमधील कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ चालली. या काळात त्यांनी भारत, चीन, हाँगकाँग आणि जागतिक स्तरावरील कामकाजात अनेक वरिष्ठ नेतृत्व पदे भूषवली. त्यांची सर्वात अलीकडील भूमिका ‘सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर, इंडिया बेव्हरेजेस’ (Senior Vice President and General Manager, India Beverages) ही होती. या पदावर त्यांनी जानेवारी 2022 ते मार्च 2025 या काळात काम केले. त्यांनी 1993 मध्ये भारतात पेप्सिकोसोबत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यापूर्वी, 1988 ते 1991 या काळात त्यांनी ब्रुक बाँड इंडिया लिमिटेड (युनिलिव्हर) मध्ये एरिया मॅनेजर आणि मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम केले होते.

आम्ही जॉर्ज कोवूर यांचे स्वागत करतो. पार्लेचा भक्कम पाया अधिक बळकट करण्यासाठी, आमची क्षमता वाढवण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत असं पार्ले बिस्किट्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय चौहान म्हणाले.

ऑपरेशन टायगर पार्ट 2 ची चर्चा; शिंदे आज दिल्लीत, ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार?

 पार्ले बिस्किट्सचे प्रमुख ब्रँड्स

1929 मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथे स्थापन झालेली ‘पार्ले बिस्किट्स’ ही भारतातील सर्वात मोठ्या बिस्किट आणि कन्फेक्शनरी (मिठाई/गोड पदार्थ) कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या अनेक दशकांत, आपल्या लोकप्रिय उत्पादनांच्या जोरावर कंपनीने देशभरातील लाखो ग्राहकांमध्ये आपली मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. पार्लेच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये पार्ले-जी, मोनॅको, हाईड अँड सीक, मेलोडी, क्रॅकजॅक (KrackJack) आणि 20-20 कुकीज (20-20 Cookies) यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.

Exit mobile version