Download App

‘राहुल गांधींसाठी योग्य मुलगी शोधा’, सोनिया गांधींनी दिली जबाबदारी

Rahul gandhi marriage : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी हरियाणातील काही महिला शेतकऱ्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संभाषणात हरियाणातील महिला शेतकऱ्यांनी राहुल गांधींचे लग्न करा, असे सांगितले. यावर सोनिया गांधी म्हणाल्या की ‘तुम्हीच चांगली मुलगी शोधा.’

राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या हरियाणा दौऱ्यात महिला शेतकऱ्यांसाठी मेजवानीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाची पूर्तता करत सोनिया गांधी यांनी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील काही महिलांना त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले.

कामं होणार नसतील महापालिकेचे आयुक्तचं बदला, संजय काकडेंची चंद्रकांतदादांकडे मागणी

जेवणासाठी आमंत्रित केलेल्या महिलांनी सोनिया गांधीं यांच्यासोबत राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा केली. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी पोहोचलेल्या एका महिलेने त्यांना म्हटले की ‘राहुलजीचे लग्न करा’. यावर सोनिया म्हणाली की, तुम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधा. राहुल गांधी हे संभाषण ऐकत तिथे उभे होते. यावेळी एका महिलेने राहुल गांधींना स्वतःच्या हाताने जेवण भरले.

दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी महिलांना सांगितले की, ‘राहुल माझ्यापेक्षा जास्त खोडकर होता, पण मला जास्त बोलणे खावे लागत होते.’ राहुल गांधी 8 जुलै रोजी अचानक सोनीपतच्या मदिना गावात पोहोचले होते. त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला. यावेळी राहुल गांधींनी त्यांना ‘दिल्ली दर्शन’साठी बोलावण्याचे आश्वासन दिले होते. या लोकांनी राहुल गांधींना सांगितले होते की राष्ट्रीय राजधानीच्या इतक्या जवळ राहूनही ते कधीच दिल्लीला गेले नव्हते.

Tags

follow us