Download App

हनी ट्रॅपमध्ये अडकलं निर्मला सीतारमण यांचं अर्थ मंत्रालय; पाकिस्तानला शेअर झाली गोपनीय माहिती?

Ministry of Finance : नवी दिल्ली : डीआरडीओ आणि बीएसएफनंतर देशाच्या अर्थ मंत्रालयातील एक कर्मचारी देखील हनी ट्रॅपमध्ये अडकला असल्याची माहिती आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार गाझियाबाद पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनंतर हेरगिरीच्या आरोपाखाली अर्थ मंत्रालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. (Ghaziabad Police have arrested a person working for the Ministry of Finance, on charges of espionage)

85 हजार रुपयांच्या मोबदल्यात या कर्मचाऱ्याने G-20 आणि इतर घडामोडींशी संबंधित कागदपत्र पाकिस्ताला पाठविली असल्याचं तपासात समोर आलं आहे. या बातमीने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पाल (27) नावाच्या व्यक्तीला इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनंतर अटक करण्यात आले आहे. आरोपी केंद्रीय वित्त मंत्रालयात कंत्राटी कर्मचारी असून तो मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून काम करतो. त्याच्याविरुद्धच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान त्याने पाकिस्तानातील कराची येथील एका व्यक्तीला अर्थ मंत्रालय आणि G20 बैठकीशी संबंधित गुप्त माहिती पाठविली असल्याचं समोर आलं आहे.

नवीन पाल हा सुरुवातीली सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजली नावाच्या एका महिलेच्या संपर्कात आला. दोघांमघील बोलणं वाढल्यानंतर एकमेकांचे नंबर एक्सचेंज करण्यात आले. त्यानंतर तो तिच्याशी व्हॉट्सअॅपवरून बोलू लागला.सुरुवातीला महिलेचा नंबर उत्तर प्रदेशातील बरेलीचा असल्याचे समजले. मात्र, नंबरचा आयपी अॅड्रेस ट्रेस केल्यानंतर तो कराचीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नवीनच्या मोबाईल फोनवर पोलिसांना अर्थ मंत्रालय आणि G20 शी संबंधित अनेक कागदपत्रेही सापडली आहेत. ‘सिक्रेट’ या नावाने काही फाईल्स सेव्ह करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नवीनच्या खात्यावरुन पोलिसांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या अलवर येथील एका महिलेने नवीनच्या खात्यावर रक्कम पाठविली होती. पोलीस सध्या या महिलेच्या शोधात आहेत.

Tags

follow us