Download App

जानेवारी 2024 पर्यंत सर्व पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असणे बंधनकारक; CM प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय

  • Written By: Last Updated:

GOA electic veicle policy : वाढत्या प्रदुषणापासून मुक्ती मिळवण्याकरिता केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक (Central Govt) वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले जाते. तर गोवा सरकारनेही (Goa Govt) मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जानेवारी 2024 पासून गोव्यातील सर्व पर्यटक वाहनांना इलेक्ट्रिक असणे अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून गोव्यातील टुरिस्ट बाईक आणि कॅब या इलेक्ट्रिक असणे बंधनकारक होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बुधवारी ही घोषणा केली. (Goa govt electic veicle policy All tourist vehicles must be electric by January 2024)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितले की, गोवा सरकारने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे जानेवारी २०२४ पासून राज्यात भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटारसायकलचाही समावेश आहे. एवढेच नाही तर सरकारी ताफ्यात सामील होणाऱ्या नवीन वाहनांनाही हा नियम लागू होणार आहे. पणजी येथे भारताच्या G20 च्या अध्यक्षतेखालील चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने NITI आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

सावंत पुढे म्हणाले, जागतिक पर्यटनाचे केंद्र असल्याने गोव्याच्या १५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत दरवर्षी ८५ लाखांहून अधिक पर्यटक राज्याला भेट देतात. राज्यात पर्यटकांच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या टॅक्सी, भाड्याची वाहने आणि बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ झाली आहे.

‘सा रे ग म प’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या पडद्यामागे चाललंय काय? 

गोव्यात निर्माण होणारे एकूण कार्बन उत्सर्जनापैकी ४० टक्के कार्बन उत्सर्जन हे वाहनामधून होते. त्यामुळं पर्यटक वाहन ईलेक्ट्रीक वाहने करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगिलतं.

दरम्यान, या नव्या धोरणानुसार, आता पुढील वर्षी जानेवारीपासून गोव्यात भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. थोडक्यात सर्व नवीन पर्यटक वाहने, भाड्याने घेतलेल्या कॅब आणि मोटारसायकली बॅटरीवर चालतील.
यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटारसायकलचाही समावेश आहे. गोवा सरकारने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us