सोन्याच्या घसरणीला ब्रेक! चांदीचा भाव किती? भाव वाढीमागचे नेमके कारण काय?

Gold price थेट २,५०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

Gold And Silver Price

Gold And Silver Price

Gold’s decline comes to halt price of silver stable what is exact reason behind price increase : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफ बाजारातून सोन्याच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज सोन्याच्या किमतीत थेट २,५०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

भारत आणि न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित; भारताच्या हातून विजय निसटला

शनिवार आणि रविवार बाजार बंद असताना सोन्याचा दर १ लाख २२ हजार ५०० रुपये होता. मात्र, सोमवारी बाजार सुरू होताच हा दर वाढून १ लाख २५ हजार रुपये प्रति तोळा झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा दर १ लाख ५५ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. विशेष म्हणजे, हे दर जीएसटी वगळून आहेत. सोन्याच्या दरात अचानक झालेल्या या वाढीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी आशियाई बाजारातील व्यवहारादरम्यान सोन्याच्या किमतीत १.२ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे ३,५७६ डॉलरवर पोहोचला. याआधी गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास ९ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति औंस ३,५१३.५४ डॉलरपर्यंत खाली आला होता. ही गेल्या १४ महिन्यांतील नीचांकी पातळी मानली जात आहे. सप्टेंबर २०२५ नंतर प्रथमच सोन्याचे दर इतक्या खालच्या स्तरावर पोहोचले होते. मार्च २०२६ नंतर प्रथमच एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत एवढी मोठी घसरण नोंदवण्यात आली. मात्र, दर घसरल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी कमी किमतीत सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. या वाढलेल्या मागणीचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात पुन्हा काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. याशिवाय, डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्येही १.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोन्याच्या किमतींचे भवितव्य अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीवर ठरणार?

आता सोन्याच्या बाजारपेठेचे लक्ष अमेरिकेत जाहीर होणाऱ्या महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. येत्या बुधवारी अमेरिकेचा वैयक्तिक उपभोग खर्च म्हणजेच पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर (PCE) यासंबंधीचा डेटा प्रसिद्ध होणार आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह महागाईचा अंदाज घेण्यासाठी या आकडेवारीला विशेष महत्त्व देते. या आकडेवारीच्या आधारे फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमधील बैठकीत व्याजदरांबाबत काय निर्णय घेणार, याचे संकेत मिळू शकतात. दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांनी शुक्रवारी व्याजदर आणखी वाढवण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते. अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सध्याचे व्याजदर पुरेसे नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या या विधानानंतर बाजारात डिसेंबरच्या बैठकीत ०.२५ टक्क्यांनी व्याजदर वाढण्याची शक्यता ९३ टक्क्यांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील व्याजदरवाढीच्या शक्यतेचा परिणाम सोन्याच्या बाजारावर होत आहे.

व्याजदर आणि डॉलरचा सोन्याच्या किमतीशी काय संबंध?

अमेरिकेतील व्याजदर आणि डॉलरची स्थिती यांचा सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम होतो. जेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते, तेव्हा अमेरिकेतील सरकारी रोखे आणि बँक ठेवींमधून मिळणारा परतावा वाढतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्याऐवजी या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर वाटू शकते. सोन्याच्या गुंतवणुकीतून नियमित व्याज मिळत नाही. त्यामुळे व्याजदर वाढल्यास सोन्यात गुंतवणूक करण्याचा आकर्षकपणा काही प्रमाणात कमी होतो. परिणामी, सोन्याची मागणी घटते आणि किमतींवर दबाव निर्माण होतो. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे व्यवहार प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्ये होतात. त्यामुळे डॉलर मजबूत झाल्यास भारतासारख्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने खरेदी करणे महाग पडते. याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर होऊ शकतो. सध्या अमेरिकन डॉलर १९ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने आणि व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची स्थिती, अमेरिकेतील महागाई आणि फेडरल रिझर्व्हचे व्याजदरविषयक निर्णय या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरांवर होऊ शकतो.

 

Exit mobile version