Download App

सावधान! तुम्ही पण गोमूत्र पिताय? अभ्यासातून झाला धक्कादायक खुलासा

Gomutra Research :  भारतामध्ये गोमूत्रावरुन वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात. भारतातील एक मोठा वर्ग असे मानतो की गोमूत्र प्यायल्याने अनेक आजार बरे होतात. तसेच  गोमूत्र आरोग्यासाठी चांगले असते, असे अनेकजण मानतात. आता एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, गोमूत्रामध्ये हानिकारक बॅक्टेरीया असून त्यामुळे गोमूत्र पिऊन फायदा नाही तर नुकसान होते. या दाव्यामुळे एकच खलबळ उडाली आहे. कारण भारतामध्ये अनेक जण असे आहेत की जे औषध म्हणून गोमूत्राचे सेवन करतात.

हा रिसर्च बरेली येथील ICAR- भारतीय पशु चिकित्सा रिसर्च इंस्टिट्यूट ( IVRI ) ना केला आहे. पशुंमध्ये रिसर्च करण्यासाठी ही संस्था देशामध्ये अग्रणी मानली जाते. भारतामध्ये पूजा-विधी व अन्य अनेक वेळेला लोक गोमूत्र पितात. पण आता यामध्ये हानिकारक बॅक्टीरिया असल्याचे IVRI येथे पीएचडी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे.

आघाडीत बिघाडी ! राजीनामा देताना ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, पवारांचे खळबळजनक वक्तव्य

यासाठी त्यांनी स्वस्थ गाया व बैलांच्या गोमूत्रांचे सँपल घेतले आहे. यामध्ये 14 प्रकारचे हानिकारक बॅक्टीरिया असल्याचे या रिसर्चमध्ये समोर आले आहे. यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. या रिपोर्टचे निष्कर्ष Researchgate या वेबसाईटवर प्रकाशित केले आहेत. IVRI मधील महामारी विज्ञानच्या प्रमुखांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, गाय, म्हैस, व मनुष्य असे एकुण 73 सँपल तपासले असता लक्षात आले की, म्हशीचे मूत्रामध्ये विषाणूंना रोखण्याची क्षमता हा गायीच्या गोमूत्रापेक्षा अधिक असते.

bird flu : चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर, 56 वर्षीय संक्रमित महिलेचा मृत्यू

त्यांनी सांगितले की, यामध्ये साहीवाल, थारपारकर व विंदावानी या गायींच्या गोमूत्रांचा अभ्यास केला. त्याचबरोबर म्हशीच्या गोमूत्राचा देखील अभ्यास करण्यात आला. या रिसर्चमधून हे सांगितले आहे की, कोणत्याही प्राण्याचे गोमूत्र हे पिण्याच्या योग्य नाही.

Tags

follow us