Download App

Gujrat : फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; 17 जण होरपळले, ढिगाऱ्याखाली कामगार अडकले

गुजरातच्या बासनकांठामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याने 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.

Gujrat : गुजरातच्या बसनकांठामधील फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडलीयं. या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू झाला असून या भीषण आगीमुळे संपूर्ण कारखानाच कोसळलायं. या दुर्घटनेत काही मजूर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आलीयं.

आज मंगळवारी सकाळच्या सुमारास गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील डीसाजीआयडीसीमध्ये फटाक्याचा कारखान्याला आहे. कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलासह एसडीआरफच्या पथकाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, भीषण आगीच्या स्फोटानंतर गोदामाचा काही भाग आणि कारखान्याचा भाग कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

follow us

संबंधित बातम्या