Download App

H3N2 विषाणुचा कहर वाढला पुद्दुचेरीमध्ये 79 रुग्ण, काळजी घेण्याचे आवाहन

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली: H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूयचा पुद्दुचेरीमध्ये कहर. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात इन्फ्लूएंझा विषाणूचे 79 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुद्दुचेरीचे वैद्यकीय सेवा संचालक जी. श्रीरामुलू यांनी सांगितले की, या विषाणूने ग्रस्त असलेल्या काही रुग्ण सापडले आहेत, परंतु या विषाणूमुळे आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

या विषाणूला घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले. या विषाणूने ग्रस्त रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने रुग्णालये आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये तयारी पूर्ण केली आहे.

श्रीरामुलू म्हणाले की, व्हायरसचा आणखी प्रसार होऊ नये यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. आम्ही सर्वसामान्यांना विनंती करतो की त्यांनी कोविड काळात ज्या प्रकारे नियमांचे पालन केले, विशेषतः हाताची स्वच्छता आणि मास्क घालणे, त्यांनी या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तेच नियम पाळावेत. या सगळ्या दरम्यान, ICMR च्या म्हणण्यानुसार, मार्चच्या अखेरीस या व्हायरसने ग्रस्त लोकांची संख्या कमी होईल.

ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन

H3N2 विषाणू आणि त्याची लक्षणे

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, H3N2 हा मानवेतर इन्फ्लूएंझा विषाणू आहे. हा विषाणू सामान्यतः डुकर आणि मानवांमध्ये पसरतो. त्याची लक्षणे हंगामी फ्लू सारखीच असतात. H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे ताप येतो आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतात. लक्षणांमध्ये खोकला किंवा वाहणारे नाक तसेच अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यांचा समावेश असू शकतो.

 

 

Tags

follow us