Download App

हरिद्वार हादरलं! मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 6 वर

Haridwar Mansa Devi Temple Stampede : उत्तराखंडमधील हरिद्वार येथील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला (Mansa Devi Temple Stampede) आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी (Haridwar Mansa Devi Temple Stampede) पोहोचली. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय.

गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात मोठी गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठा स्फोट! संजय राऊतांचा खळबळजनक दावा, दहा वर्षांत न घडलेलं आता घडणार…

पायऱ्यांमध्ये करंट असल्याचा संशय

सुरुवातीच्या माहितीनुसार ही घटना जिन्यावर घडली. पायऱ्यांमध्ये करंट असल्याचा संशय आहे, त्यानंतर भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. गढवालचे डीसी विनय कुमार यांनी आज तकशी खास बातचीत करताना करंटची बाब फेटाळून लावली आहे. अपघाताचे कारण तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात सकाळी झाला, परंतु तेथील परिस्थिती सामान्य आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी; एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक

अपघाताची माहिती देताना एसपी प्रमोद सिंह म्हणाले की, सकाळी 9 वाजता नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, मनसा देवी मुख्य रस्त्यावर चेंगराचेंगरीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुमारे 35जणांना रुग्णालयात आणण्यात आले. इतर गंभीर जखमींना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेंगराचेंगरी मागील नेमके कारण काय?

प्रथमदर्शनी या अपघातामागील कारण मुख्य रस्त्यावरून विद्युत प्रवाह वाहत असल्याची अफवा असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना जिना रस्त्यावर घडली. प्रशासनाच्या दाव्यांच्या विरोधात, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की मंदिराजवळ एक खांब आहे, जिथे शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किटनंतर लोकांनी सांगितले की, या खांबातून करंट येत आहे, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे की, मंदिराच्या मुख्य रस्त्यावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना ही चेंगराचेंगरी झाली. रविवार असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अपघातानंतर मंदिर परिसरात आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतांचा नेमका आकडा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेला नाही.

 

follow us