Download App

LIVE: जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताच्या दिशेने; 50 हून अधिक जागांवर पुढे

जम्मू-काश्मीर आणि हरियानामधील विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक घटनेचं लाईव अपडेट पहा लेट्सअप मराठीवर.

  • Written By: Last Updated:

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE :  जम्मू-काश्मीर आणि हरियानामधील ९० विधानसभा मतदारसंघांसाठी आज मंगळवार (दि. ८ ऑक्टोबर)रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. २०१४ नंतर जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत पार पडल्या आणि त्यात ६३.४५ टक्के मतदान झाले, जे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नोंदवलेल्या ६५.५२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरम्यान, आपण प्रत्येक ठिकाणचा रिझल्ट पाहा लाईव्ह.

हरियानातील ९० जागांवर मतदान संपल्यानंतर राज्यात नवीन सरकार कोणाचं येणार हे समजण्यासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. हरियाणात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबतही चुरस सुरू झाली आहे.

 

 

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Oct 2024 10:36 AM (IST)

    हरियाणातू आम आदमी पार्टी साफ, सर्वच मतदारसंघ पिछाडी

    हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले. 88 जागांवर उमेदवार दिले. मात्र मतमोजणीत आप हरियणातून साफ होताना दिसत आहे. आम आदमी पार्टी एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही.

  • 08 Oct 2024 10:35 AM (IST)

    LIVE: जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताच्या दिशेने; 50 हून अधिक जागांवर पुढे

    Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE :  जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काही तासांतच चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी आहे. भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख नेत्यांना केंद्रशासित प्रदेशात पुढील सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांनी निवडणूकपूर्व युती केली होती. 90 सदस्यांच्या सभागृहात ते स्वबळावर 46 चा जादुई आकडा पार करतील असा दावा आघाडीने केला आहे.

  • 08 Oct 2024 10:27 AM (IST)

    हरियाणात भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धक्का

    हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Haryana Assembly Elections) सुरू आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर (Congress Party) होती. परंतु, थोड्याच वेळात येथील चित्र पूर्ण बदलले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांनुसार भाजप हरियाणात जवळपास 51 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.

  • 08 Oct 2024 09:17 AM (IST)

    जुलानामधून काँग्रेसच्या विनेश फोगाटची जोरदार आघाडी

    Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील जुलाना मतदारसंघातील हाय होल्टेज लढतीत काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट आघाडीवर असून भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन योगेश बैरागी पिछाडीवर पडले आहेत.

  • 08 Oct 2024 09:00 AM (IST)

    LIVE: हरियाणात काँग्रेसची जोरदार लाट, 57 जागांवर आघाडी; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी ट्रेंडमध्ये

    Haryana and Jammu Kashmir Result : हरियाणाच्या विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी राज्यात 93 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. दुष्यंत चौटाला उचान कलानमधून पिछाडीवर आहेत. लाडवामधून नायब सैनी आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 08:47 AM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी आणि भाजपात कांटे की टक्कर..

    जम्मू आणि काश्मीर राज्यात सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस-एनसी आघाडी आणि भाजपात अटीतटीची लढत सुरू आहे. सध्याच्या आकडेवारीत भाजप काश्मीरात सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 75 जागांचे कल हाती येत आहेत. सध्या काँग्रेस आणि एनसी आघाडी 34 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 28 जागांवर आघाडी घेत घोडदौड करत आहे.

  • 08 Oct 2024 08:42 AM (IST)

    हरियाणात काँग्रेसची घोडदौड, 46 जागांवर आघाडी, भाजपाची पिछेहाट

    हरियाणात मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीची मात्र पिछेहाट झाली आहे. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत. त्यात काँग्रेस राज्यातील 42 मतदारसंघात आघाडीवर आहे. तर भाजपने 16 मतदारसंघांत आघाडी घेतली आहे. उचान मतदारसंघातून दुष्यंत चौटाला पिछाडीवर पडले आहेत. लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 08:04 AM (IST)

    हरियाणा, जम्मू काश्मिरात मतमोजणीला सुरुवात

    हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरू आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

follow us

संबंधित बातम्या