Download App

Karnataka Election Result: एचडी कुमारस्वामी जिंकले, पण एक स्वप्न भंगले

Karnataka Election Result 2023: माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले होते पण काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचे स्पप्न भंगले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एचडी कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD DeveGowda) यांचे पुत्र आहेत. त्यांनी रामनगरम जिल्ह्यातील चन्नापटना येथून निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे सीपी योगेश्वर यांचा पराभव करत निवडणूक जिंकली आहे.

एचडी कुमारस्वामी यांची राजकीय कारकिर्द
चन्नापटना मतदारसंघात कुमारस्वामी यांच्याविरोधात भाजपने सीपी योगेश्वर यांना उमेदवारी दिली होती. आम आदमी पक्षाने सीपी सरतचंद्र यांना तर काँग्रेसने गंगाधर एस. यांना मैदानात उतरवले होते. वोक्कालिगा आणि कुर्बा समाजाच्या पारंपारिक मतदारांमध्ये जेडीएसची चांगली पकड आहे. 2004 पासून चन्नापटना मतदारसंघात कुमारस्वामी यांचा एकदाही पराभव झालेला नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामी यांना 48 टक्के, तर योगेश्वर यांना 43 टक्के मते मिळाली.

Karnataka Election : कर्नाटक गेले, आता ‘या’ दोन राज्यांचा नंबर; ममता बॅनर्जींचं भाकीत

23 मे 2018 ते 23 जुलै 2019 पर्यंत कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. एचडी कुमारस्वामी हे आघाडी सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. कुमारस्वामी यांनी 1996 मध्ये कनकापूर लोकसभा मतदारसंघातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.

दरम्यान, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांना सर्वाधिक पसंती होती तर बसवराज बोम्मई दुसऱ्या क्रमांकावर होते. तिसऱ्या क्रमांकावर जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी होते. 18.1 टक्के मतदारांनी पहिली पसंती म्हणून एचडी कुमारस्वामी यांना कौल दिला होता.

Tags

follow us