Download App

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कामगारांच्या किमान वेतनात वाढ, ‘या’ दिवशी लागू होणार नवीन दर

Workers Minimum Wage Hike: केंद्र सरकारने मोठी घोषणा करत देशात वाढणाऱ्या महागाईत कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने

  • Written By: Last Updated:

Workers Minimum Wage Hike: केंद्र सरकारने मोठी घोषणा करत देशात वाढणाऱ्या महागाईत कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने असंघटित क्षेत्रातील (Unorganized Sector) कामगारांच्या महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

इमारत बांधकाम, लोडिंग आणि अनलोडिंग, वॉच अँड वॉर्ड, साफसफाई, गृहनिर्माण, खाणकाम आणि केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांखालील कृषी यासह विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या कामगारांना सुधारित वेतन दरांचा फायदा होणार आहे. तसेच नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये केंद्र सरकारने वेतन वाढीबाबत निर्णय घेतला होता. औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून VDA मध्ये वर्षातून दोनदा सुधारणा करते.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि उच्च कुशल – तसेच भौगोलिक क्षेत्र – A, B आणि C यानुसार किमान वेतनाचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, लोडिंग आणि अनलोडिंग या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अकुशल कामासाठी ‘अ’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

अर्धकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (रु. 20,358 प्रति महिना) आणि कुशल, कारकून आणि वॉचमन आणि नि:शस्त्र वॉचमनसाठी 868 रुपये प्रतिदिन (रु. 22,568 दरमहा), 954 रुपये प्रतिदिन (24,804 रुपये प्रति महिना) असेल आणि अत्यंत कुशल आणि सशस्त्र वॉचमनसाठी प्रतिदिन रु. 1,035 (रु. 26,910 प्रति महिना) असेल.

मोठी बातमी! बिल्किस बानो प्रकरणात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पुनर्विचार याचिका फेटाळली

मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय), भारत सरकार (clc.gov.in) यांच्या वेबसाइटवर क्षेत्र, श्रेणी आणि क्षेत्रनिहाय किमान वेतन दरांबाबत तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.

जामखेडच्या कुसडगाव येथील SRPF प्रशिक्षण केंद्राच्या गेटवर राडा, रोहित पवारांचा ठिय्या आंदोलन

follow us

संबंधित बातम्या