Download App

लोक मांसाहारी झाल्यानेच हिमाचलात ढगफुटी; IIT मंडी संचालकांचं अजब विधान

IIT Mandi Director : उत्तर भारताने यंदा निसर्गाचं रौद्र रुप अनुभवलं. हिमाचल प्रदेशातर मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. निसर्ग कोपल्याचा अनुभव हिमाचलातील लोकांनी घेतला. मात्र निसर्गाची इतकी अवकृपा का झाली, याचं अजब उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT Mandi) संचालकांनी दिलं आहे. राज्यातील भू स्खलनाच्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरु असतानाच त्यांनी हे अजब विधान केले आहे.

आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा फक्त दावा करुनच थांबले नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या असे आवाहनही केले. प्राण्यांची मांसाहारासाठी क्रौर्याने हत्या केली जाते. त्याच क्रौर्यामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणी ढगफुटी यांसारख्या घटना घडत आहे, असा दावा त्यांनी केला. बेहरा यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फडणवीस-पवार पंचतारांकित शेतकरी, त्यांना दुष्काळाचं.. ठाकरे गटाचे टीकास्त्र

बेहरा यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी संदीप मनुधाने यांनी ट्विट करत म्हटले की जे मागील 70 वर्षात निर्माण करण्यात आले ते असे अंधश्रद्धाळू लोक नष्ट करत आहेत. बेहरा यांचं वक्तव्य चुकीचं आहे. आपले पतन झाले आहे असेच म्हणावे लागेल. बायोफिजिक्सचे प्रोफेसर गौतम मेनन यांनी बेहरा यांचे वक्तव्य अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, यंदा जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशात प्रचंड पाऊस कोसळला होता. धर्मशाळा आणि परिसरात ढगफुटी झाली होती. या ढगफुटीमुळे प्रचंड पूर येऊन त्यात शेकडो वाहने वाहून गेली. देशभरातून आलेले पर्यटकही येथे अडकून पडले होते. सिमल्यात काही काळ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले होते.

Tags

follow us